कोल्हापूर - 'असा' निर्णय घेणारी पट्टणकोडोली ग्रामपंचायत जिल्ह्यात ठरली तिसरी  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी यांनीही आरोग्य केंद्राला भेट देऊन याबाबतच्या इतर सुचना दिल्या.

पट्टणकोडोली - जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या रोजच वाढत आहे. आजही दिवसभरात जिल्ह्यात २७० नव्या रूग्णांची भर पडली आहे. यामध्ये पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे नऊ रूग्ण आढळले आहेत. परंतु, जवळच्या कोणत्याच कोवीड केअर सेंटरमध्ये जागा नसल्याने आज रग्णांना घरीच विलगीकरण करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असा प्रयोग करणारी पट्टणकोडोली ग्रामपंचायत जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत ठरली आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी यांनीही आरोग्य केंद्राला भेट देऊन याबाबतच्या इतर सुचना दिल्या. येथील विकासनगरमध्ये ७५ वर्षीय वृद्ध व अलाटवाडी भागात ८२ वर्षीय वृद्ध अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याने गावातील रुग्णांची संख्या काल अखेर १३ वर पोहोचली होती. आज सकाळी हुपरे नगर भागात ७७ वर्षिय सेवानिवृत्त शिक्षक तर एका डाँक्टरच्या घरातील तब्बल ९ जणांना बाधा झाली आहे. या ९ जणांना पुढिल उपचारासाठी पाटवण्यात येणार्‍या कोणत्याही कोवीड सेंटरमध्ये जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करुन उपचार करण्याचा निर्णय कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आला. यासाठी विलगीकरण घराची पूर्ण तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून विलगीकरण कक्षांची माहिती घेतली. त्याचबरोबर आरोग्य सेवकांना रुग्णांच्यावरील उपचार व तपासणी करण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. तसेच विलगीकरण कक्षातील रुग्णांनाच्या बाबतीत करावयाची देखरेख याचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच  विजया जाधव, अरूण माळी, अरोग्य सेवक अमर पाटिल, राधिका घाटगे, राजू तराळ, रावसाहेब कारदगे व मोहन वर्धन आदी उपस्थित होते. 

हातकणंगलेत चार नव्या रूग्णांची भर

 दोन दिवसांच्या ब्रेकनंतर हातकणंगलेत आज परत चार नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. एकूण रुग्णसंख्या ५७ वर पोहचली असून यापैकी ३३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजवर दोघांचा मृत्यू झाला असल्याने अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २२ झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांत हातकणंगलेत एकही कोरोना बाधित सापडला नसल्याने नागरिकांना हायसे वाटत होते, तर प्रशासनही ढिले पडले होते.  मात्र आज परत चौघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनासह सर्वांचे धाबे दणाणले आहेत. 

हे पण वाचा - महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूरकरांना झोडपले पण... 

चार - पाच दिवसांपूर्वी एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर कोलहापुरातील खाजगी रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. त्यांची शिक्षिका पत्नी व दोन जुळ्या मुलींनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्या तिधींचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्यात घरकामाला येणाऱ्या महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्यापैकी तिच्या बारा वर्षाच्या मुलींचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine new corona case in kolhapur pattankodoli