ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; आणखी नऊ जणांना लागण 

nine new corona positive case in kolhapur
nine new corona positive case in kolhapur

कोल्हापूर  - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून आज दिवसभरात एकूण 9 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यात शहरातील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 824 झाली आहे तर दिवसभरात दोन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने एकूण 714 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण 99 कोरोनाबाधितांवर विविध शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात 367 व्यक्तीचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. तर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यात कोल्हापूर शहर 3, रेंदाळ (ता. हातकणंगले) 1, आंबवडे (ता. पन्हाळा) 1 , बालनगर इचलकरंजी 1 व जूना चंदूर रोड इचलकरंजी 1, अडकूर (ता. चंदगड) 2 यांचा समावेश आहे. 
यातील सहा व्यक्ती घरातील कोरोनाग्रस्तच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर उर्वरीत 3 व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत. या सर्व व्यक्ती जिल्ह्यातील वेगवेगळ्या 6 कोवीड सेंटरमध्ये क्वारंटाईन होत्या. शासकीय कोवीड सेंटरवर आज झालेल्या आरोग्य तपासणीत आजारी असलेल्या तसेच बाहेरगावावरून आलेल्या 355 व्यक्तीचे स्वॅब घेतले आहेत. या स्वॅब तपासणीचे अहवाल दोन दिवसात येणार आहेत. तर कोरोनावर उपचार घेणाऱ्या पैकी आज दिवसभरात फक्त दोन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे सद्या 99 कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत. 

इचलकरंजीतील कुडचे मळा कनेक्‍शनधून आणखी दोघे बाधित 

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या कुडचे मळा कनेक्‍शनमधून आणखी दोघांचा अहवाल रात्री पॉझीटीव्ह आला. बाळनगर परिसरातील 44 वर्षीय तर जूना चंदूर रोडवरील 40 वर्षीय अशा दोन यंत्रमाग कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कुडचे मळा कनेक्‍शनमधून आतापर्यंत 23 जणांना संसर्ग झाला आहे. 

सकाळच्या सत्रात तब्बल 30 अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता. मात्र सांयकाळी आणखी एकाला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल आज रात्री आला. त्यामुळे शहरात बाधीतांची संख्या 32 वर पोहचली असून ऍक्‍टीव्ह रुग्णांची संख्या 25 इतकी आहे. 

आज संसर्ग झालेले दोन्ही यंत्रमाग कामगार आहेत. एकजण बाळनगर परिसरात तर दुसरा जूना चंदूर रोड परिसरात राहत आहे. दोघेही कुडचे मळा परिसरातील वेगवेगळ्या यंत्रमाग कारखान्यात कामाला आहेत. दोघांना रात्री उशिरा त्याला सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शहरात सध्या पाच प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. त्यामध्ये आणखी दोन झोनची त्यामध्ये वाढ होणार आहे. 

""प्रशासनाकडून ठोस उपाय योजा सुरु करण्यात आल्या असून वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होवू,"" 
- डॉ. सुनिलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी

नगराध्यक्षांचे खबरदारीचे आवाहन 
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी आज कुडचे मळा, दातार मळा, काडापूरे तळ या प्रतिबंधीत क्षेत्राला भेट देवून पाहणी केली. या परिसरातील नागरिकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस निरिक्षक ईश्‍वर ओमासे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, मुख्य स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, नगरसेवक राजवर्धन नाईक उपस्थीत होते. 

दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरुच 
पालिकेने दुकानदारांवर कारवाईचे सत्र सुरुच ठेवले आहे. विनावपरवाना व्यवसाय करणाऱ्या दोघांवर तर सांयकाळी 5 वाजल्यानंतर दुकाने सुरु ठेवल्याप्रकरणी 8 जणांवर कारवाई करीत प्रत्येकी 500 या प्रमाणे 5300 रुपयांचा दंड वसूल केला. मास्क व हॅन्ड ग्लोवजचा वापर न केलेल्या 59 नागरिकांवर कारवाई करीत 5900 रुपये दंड वसूल केला.

तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची संख्या अशीः 
आजरा 80, भुदरगड 75 ,चंदगड 84, गडहिंग्लज 100, गगनबावडा 7, हातकणंगले 16, कागल 57, करवीर 25, पन्हाळा 29, राधानगरी 68, शाहूवाडी 184, शिरोळ 8, इचलकरंजी 34, कोल्हापूर शहर 44, अन्य राज्य 13. 

एकूण कोरोनाग्रस्त --- 823 
एकूण कोरोनामुक्त---- 714 
मृत्यू -----------------10 
सद्या उपचार घेणारे ----- 99 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com