लॉकडाऊन नाही पण सतर्कता बाळगा ः पालकमंत्री सतेज पाटील

No lockdown but be careful: Guardian Minister Satej Patil
No lockdown but be careful: Guardian Minister Satej Patil
Updated on

कोल्हापूर : लॉकडाऊनहा कोणत्याही घटकाला परवडणारा नाही. त्यामुळे सतर्कता बाळगा. "नो मास्क नो एन्ट्री' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी,'' असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. सर्व यंत्रणा सज्ज ठेवू. जिल्ह्याला कोव्हिड पासून मुक्त ठेवू, असे आवाहन केले. नियम न पाळणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियोजनाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ""कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी काटेकोर उपाययोजना करायला हव्यात.'' जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ""प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रिवर भर द्यावा लागेल.'' 
बलकवडे यांनी लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे, असे आवाहन केले. 
चव्हाण म्हणाले, ""खानावळी, हॉटेलमध्ये बैठक रचनेत बदल करावा. खासगी रुग्णालयात "मी लस घेतली आहे, लस सुरक्षित आहे, ती आपणही घ्यावी' असे फलक डॉक्‍टरांनी लावावेत.'' 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी संगणकीय सादरीकरण केले. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
... 

कोरोना प्रतिबंधक नियम, उपाय असे 
-प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार वाहतूक हवी 
-50 टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत, लॉकडॉऊनची वेळ येवू देऊ नका 
-स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, पॉस मशिनसाठी सॅनिटायझर वापरा 
-लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी जावे 
-खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी 
-मास्क शिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी 
-शाळा, महाविद्यालयांत शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा 
-मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी पालन करावे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com