No Mechanics Available For Pump Repair Kolhapur Marathi News
No Mechanics Available For Pump Repair Kolhapur Marathi News

वीज पंप दुरुस्तीसाठी मेकॅनिक्‍स मिळेनात

Published on

चंदगड : दुरुस्तीअभावी वीज पंप बंद, संचारबंदीमुळे मेकॅनिकला आपले गाव सोडून दुसऱ्या गावात जाता येत नाही. आला तरी दुरुस्तीसाठी आवश्‍यक साहित्याची दुकाने बंद या स्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदीत, विहिरीत पाणी असताना वीज पंपाअभावी पिके वाळताना बघावे लागत आहे. 

संचारबंदीमध्ये शेतीकामांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश केला आहे. शेतकरी, शेत मजूर शेतात राबतही आहेत. उसाची भरणी, खताची मात्रा देणे, भाजीपाला पिकाची भांगलण- खुरपण करणे सुरू आहे. कडक उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याच्या पाळ्याही सुरू आहेत. गतवर्षी पुराच्या पाण्यात घटप्रभा आणि ताम्रपर्णी नदीकाठचे शेकडो वीज पंप दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे; पण पंप नादुरुस्त झालेल्यांची अडचण झाली आहे.

मेकॅनिक आपले गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ शकत नाहीत. आले तरी दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणायचे कोठून हा प्रश्‍न आहे. फुटलेल्या जागी तसेच वाढीव लाईनसाठी पाईप्स मिळत नाहीत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असतानाही तांत्रिक अडचणींमुळे पिके वाळताना पाहावी लागत आहेत. 

शेतीपूरक सेवासुद्धा अत्यावश्‍यक सेवेत हव्यात
शेतीचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करताना त्यासाठी अनुषंगिक सर्वच साहित्य उपलब्ध करायला हवे. शेतीपूरक सेवासुद्धा अत्यावश्‍यक सेवेत हव्यात. 
- चंद्रकांत पाटील, शेतकरी, हंबेरे. 
 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com