भयंकर , ना सोशलडिस्टन्स, मास्क, ना सॅनिटायझरचा वापर

प्रतिनिधी
शुक्रवार, 29 मे 2020


जिल्ह्यात कृषी आयुक्तांनी महिन्याला जे नियोजन केले आहे. त्यानुसार खते वाटप झाली पाहिजेत. तरच जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण होणार नाही, अशी परिस्थिती आहे. पावसापूर्वी उसाला खतांचा डोस देणे गरजेचे असते. युरियाची सर्वाधिक मात्रा दिली जाते. मात्र प्रत्येकवर्षी प्रमाणे या वर्षीही युरियाची टंचाई जाणवत आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात खतांच्या टंचाईने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे मागणी नसताना ऐन हंगामातच खत टंचाई होतेच कशी, असा सवाल केला जाता आहे. युरियाची मोठी टंचाई जाणवत आहे. एक-एका गावात एकही पोते युरिया मिळत नाही. आज येईल-उद्या येईल, अशी अस सांगून खत विक्रेते शेतकऱ्यांना चालढकल करत आहेत.

याउलट युरिया सोबत लिंकिंग किंवा लिक्विड खत घेणाऱ्याला युरिया दिला जात असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांची लुट केले जात आहे. 
जिल्ह्यात कृषी आयुक्तांनी महिन्याला जे नियोजन केले आहे. त्यानुसार खते वाटप झाली पाहिजेत. तरच जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण होणार नाही, अशी परिस्थिती आहे. पावसापूर्वी उसाला खतांचा डोस देणे गरजेचे असते. युरियाची सर्वाधिक मात्रा दिली जाते. मात्र प्रत्येकवर्षी प्रमाणे या वर्षीही युरियाची टंचाई जाणवत आहे. याशिवाय, संयुक्त दाणेदार खतांचा पुरवठाही अपेक्षीत प्रमाणत होत नाही. खरीप हंगामासाठी 55 हजार टन खतांची मागणी आहे. यापैकी 25 मे पर्यंत 13 हजार टन खतांचा पुरवठा झाला आहे. आता सर्वाधिक मागणी युरियाची होत असताना युरिया दिला जात नाही. ज्या-ज्या कंपन्यांकडे युरियाची मागणी केली आहे. त्यातील ठराविकच कंपन्यांनी आपली मागणी पूर्ण केली आहे. उर्वरित कंपन्या याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. 

प्रत्येक महिन्याला किती खतांचे वाटप व्हावे, यासाठी कृषी आयुक्तांची चांगले नियोजन केले आहे. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नाही. नियोजनानुसार पुरवठा झाल्यास जिल्ह्यात खतांची टंचाई जाणवणार नाही. 
सुनील ढुणूंग, खत विक्रेते 
.... 
जिल्ह्यात युरियाची मागणी आहे. इतर खतांची टंचाई नाही. पण उद्या (शुक्रवार) जिल्ह्यात युरिया खत येणार आहे. त्यामुळे शनिवारपासून शेतकऱ्यांना अपेक्षित युरिया मिळू शकेले. 
- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No social distance, no use of masks, no sanitizers