
कोल्हापूर - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून विविध उपाययोजना राबवण्यात येत असताना शहरी आणि ग्रामीण भागातील काही एटीएममध्ये मात्र खबरदारी घेतली जात नसल्यचे चित्र आहे. उपनगरातील एटीएममध्ये सॅनिटायजेशनची व्यवस्था नसल्यामुळे विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यासाठी विशेष लोकांची पगारी नेमणूक करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्स पाळले जात आहे. हस्तांदोलन टाळणे, बोलताना अथवा भेटताना किमान 3 फुटांचे अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर लावणे असे उपाय सर्वजण करत आहेत. सार्वजनिक ठिकाणे तर बंदच केली आहेत, मात्र अशाप्रकारची खबरदारी मात्र शहरासह, उपनगर परिसर आणि ग्रामीण भागातील एटीएम सेंटरवर घेतली जात नसल्याचे चित्र आहे. नुकतेच अनेकांचे पगार झाले असून, अधिकतर पगार हे ऑनलाईन पद्धतीने दिले आहेत. यामुळे अनेकांनी हे पैसे मिळवण्यासाठी बॅंक अथवा एटीएम सेंटरवर धाव घेतली आहे. या एटीएम सेंटरचा वापर विना दिक्कत कोणीही करू शकत असल्यामुळे याठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. एटीएम सेंटरमध्ये मशीनशी होणार संपर्क हा प्रत्यक्ष असतो. शिवाय या ठिकाणी एसीही सुरू असतो, असे हे चित्र धोकादायक आहे. यातच या ठिकाणी सॅनिटायझर नसल्यामुळे हात सॅनिटायझरने स्वच्छ करून या एटीएमची हाताळण्याची सुविधाही नाही, अशी व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे आहे.
एटीएम ची सुरक्षा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी याचे पालन होत नाही आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम ठिकाणी सॅनिटायझर देण्यासाठी रोजंदारी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. अश्या ठिकाणी नेमणूक असणारे मात्र आपली भूमिका चोख बजावत असून येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर देतात. शिवाय थोड्या थोड्या वेळाने मशीनचे सॅनिटायझेशन देखील केले जाते.
एटीएमवर अशी घ्या काळजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.