सार्वजनिक ठिकाणी पिचकारी नव्हे तर कोरोनाचे स्फोटकच!

 Not a spit in a public place, but an explosive corona!

Updated on

कोल्हापूर,: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या. सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरण्याबरोबर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, धुम्रपान करू नये. अशा सूचना सतत करण्यात येत आहेत. परंतु नागरिकांनाकडून या खबदारीच्या उपाययोजनांना बगल दिली जात आहे. रस्त्यात, चौकात गुटखा, पान, मावा खात बिनदास्तपणे थुंकण्याचे धक्कादायक प्रकार शहरात विविध ठिकाणी दिसून येत आहेत. 
थुंकी हे कोरोना विषाणूचे स्फोटकच आहे. कोरोना संसर्गित व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकल्यातून आणि थुंकण्यातून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या थुंकीत करोडो कोविडचे विषाणू असतात. व्यक्तीच्या हाता-पायांना, कपड्यांना आणि विशेषत: रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्याच्या चपलांना चिकटून या विषाणूचे विविध ठिकाणी वहन होण्याचा मोठ्ठा धोका असतो. दिवसागणिक शहरात बांधितांची संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असताना नागरिकांकडून मात्र बाजारपेठ, दुकानांत गर्दी करणे, मास्क न वापरे असे प्रकार घडत आहेत. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना दंड करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली; परंतु बेजबाबदारपणे कुठेही थुंकणाऱ्यावर कारवाई करत शिस्त लावण्याची सध्या गरज आहे. 

हे आहेत थुंकण्याचे स्पॉट... 

शहरातील पान टपऱ्या... 

लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन परिसर येथे चौकात, फूटपाथवर काही व्यावसायिकांचा गराडा असतो. दहा पंधरा जणांचा येथे कायम वावर असतो. त्यातील बिगर मास्कचे अनेक जण असतात. ग्राहक नसताना फूटपाथवर बसून गुटखा खात खुशाल पिचकाऱ्या मारत तेथील रस्ता तसेच केएमटी स्टॉप थुंकीने लाल झालेला दिसून येतो. तसेच शहरातील निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, रंकाळा स्टॅण्ड परिसरात असणाऱ्या पान टपऱ्या या धुम्रपानाच्या केंद्रे आहेत. या भागात मास्क काढत सिगारेट ओढणे, पान, तंबाखू खात तिथेच थुंकत उभारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

शहरातील सिग्नल्स... 
मुख्य सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या काचा खाली घेत पचकन पिचकारी मारण्यामध्ये अनेक नागरिक आघाडीवर आहेत. दुचारीस्वार ही मास्क अगर हेल्मेट खाली घेत थुंकताना आढळतात. असं थुंकू नका, असा उपदेश काही लोकांनी केला तर भांडण काढण्याच्या तयारी काही लोक असतात. शहरातील व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, उमा चौक, हॉकी स्टेडिअम, कावळा नाका, सायबर चौकातील सिग्नलवर लोकांकडून थुंकण्याचे प्रकार होतात. 

मध्यवर्ती एसटी स्थानक... 

प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी विविध कोपऱ्यामध्ये पिचकारी मारण्याची संधी लोक शोधत असतात, थुंकल्यानंतर आपल्याला कोणी पाहिलं नाही ना याकडे ही लोकांची नजर असते. एस.टी.प्रशासनाकडून बसमध्ये तसेच परिसरात थुंकण्यास प्रतिबंध असल्याच्या सूचना लावलेल्या असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी थुंकत चूळ भरणे, तोच हात नळाला लावल्याने संसर्गाचा धोका आहे. प्रवासी फलाटावर उभारत थुंकतात, एसटीच्या खिडकीतून बेफिकीरीने पिचकारी मारतात. एसटीचे काही चालक-वाहक ही हा प्रकार करताना दिसून येत आहे.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com