रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आता ग्राह्य धरले जाणार

now accepted Certificate of Registered Medical Practitioner, Medical Officer in kolhapur said commissioner in kolhapur
now accepted Certificate of Registered Medical Practitioner, Medical Officer in kolhapur said commissioner in kolhapur

कोल्हापूर : शहरात घडणाऱ्या मृत व्यक्तींचे दहन अथवा दफन करण्यासाठी कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अथवा खासगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आता स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार होऊ शकतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज दिली.

महापालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ रविवारी (१५)  संपुष्टात आला. सद्य:स्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात घडणाऱ्या मृत व्यक्तींचे दहन अथवा दफन नगरसेवकांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरुन करण्यात येत होते. यापुढे नागरिकांच्या सुविधेसाठी सोमवारी (१६) पासून नूतन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत शहरात घडणाऱ्या मृत व्यक्तींचे दहन अथवा दफन करण्यासाठी कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अथवा खासगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

महापालिका क्षेत्रातील एखाद्या नागरिकाचा घरी नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला स्थानिक नगरसेवकाकडून प्रमाणपत्र दिले जात होते. परंतु, सभागृहाचा कार्यकाळ रविवारी (१५) संपत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वरील निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचे मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांनी मागणी केल्यास रजिस्टर्ड मेडिकल प्रॅिक्‍टशनर अथवा खासगी किंवा शासकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्‍यक ती तपासणी करुन मृत्यू प्रमाणपत्र द्यावे, या प्रमाणपत्राच्या आधारे स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार होतील, याची नागरिकांनी नोंद घेऊन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com