आता वाटचाल ग्लोबल कोल्हापूरकडे ःएक्‍स्पोर्ट प्रमोशन समितीचे उद्दिष्ट

Now on the way to Global Kolhapur:
Now on the way to Global Kolhapur:

कोल्हापूर ः औद्योगिक, वस्त्रोद्योग, फूड टेक्‍नॉलॉजी आणि आयटी, आयटीईएसच्या माध्यमातून ग्लोबल कोल्हापूरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोल्हापुरातील चार विभागांतून होणारे उत्पादन, त्याची क्षमता आणि त्यांना देश-विदेशात असलेली मागणी यातून ही वाटचाल सुरू करण्याचा अजेंडा आता एक्‍स्पोर्ट प्रमोशन कमिटीचा आहे. 
क्षमता आहे, पण मार्ग सापडत नाही, ही कोल्हापूरची स्थिती आता बदलणार आहे. आता ग्लोबल कोल्हापूरची वाटचाल सुरू झाली आहे. येथील काही उद्योजकांनी त्यांचे उत्पादन सातासमुद्रपार नेले, मात्र कोल्हापूरच ग्लोबल बनविण्यासाठी आवश्‍यक तितक्‍या ताकदीने प्रयत्न झाले नाहीत. नेमकी हीच स्थिती ओळखून खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यामातून हे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या असोसिएशनचे तज्ज्ञ, अध्यक्ष या समितीचे सदस्य आहेत. समितीने आता चार प्रमुख आणि एक उप अशा क्षेत्रावर काम करण्यास सुरवात केली आहे. 
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, तेथे अभियंता आणि त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविले जाणार आहेत. या क्षेत्रात जास्तीत जास्त अभियंत्यांना प्रोत्साहित केले जाई. देशात तीन क्रमांकाचे उत्पादन असलेला आणि महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगालाही प्रोत्साहित करून निर्यात कशी वाढविता येईल, यावर काम सुरू झाले आहे. 
इचलकरंजीत सध्या टेक्‍स्टाईल कॉलेज असल्यामुळे त्याचाही फायदा येथे होणार आहे. फूड टेक्‍नॉलॉजीमध्ये गूळ पावडर, आयसिंग साखर, भाज्या, टोमॅटो यांचेही उत्पादन करून त्यांची थेट परदेशात विक्री करण्यासाठी मोठी संधी आहे, मात्र त्यासाठी आवश्‍यक ज्ञान आणि त्या दर्जाचे उत्पादन होत नाही. त्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार आहे. याचबरोबर सध्या नोयडा, बंगळूर, दिल्ली, मुंबईत कार्यरत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागातील तरुणांसाठी कोल्हापुरात स्थान देण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या वर्क फ्रॉम होम काम सुरू असल्यामुळे कोल्हापुरातून ही आयटी आणि आयटीईएस सर्व्हिसेस देणे शक्‍य असल्याचे दिसून आले. त्याचाही फायदा घेऊन नवीन धोरणातून आयटी सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न कमिटीने सुरू केले आहेत. 


कोल्हापूर ग्लोबल बनविण्यासाठी कोणतीही व्यक्ती त्यांचे योगदान किंबहुना संकल्पा समितीकडे देऊ शकते. यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि संबंधित असोसिएशनकडे त्यांची माहिती ते देऊ शकतात. सर्वांचे योगदान स्वागतार्ह आहे. 
विद्यानंद मुंडे, समिती सदस्य, संचालक चेंबर ऑफ कॉमर्स 

दर्जा, मार्केटिंगसाठी प्रयत्न 
कोल्हापुरातील लेदर उद्योगासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध असले तरीही त्याचा मूळ दर्जा येथे टिकविला जात नसल्याचे दिसून येते. ते टिकविण्याबारोबरच त्याचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणात करणे यासह इतर ही प्रयत्न सुरू झाले आहेत.

संपादन - यशवंत केसरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com