कोल्हापुरातील या गावाला बसतो महापुराचा सर्वाधिक फटका 

 जितेंद्र आणुजे  
Friday, 7 August 2020

तालुक्यातील 42गावांपैकी सर्वाधिक जलमय होवून बेटाचे स्वरूप प्राप्त होणारे हे गाव होय.

नृसिंहवाडी - शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक महापुराचा फटका बसणारे गाव कोणते? असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा गावाचे नाव समोर येते, ते म्हणजे शिरोळ तालुक्याची काशी आणि दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणून लौकिक असणारे श्री क्षेत्र नृसिंहवाडी. 

383 भौगोलिक  हेक्टरी क्षेत्रफळ असणारे आणि 4126 लोकवस्तीचे हे गाव. कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावर सहाशे ते सातशे वर्षांपूर्वीपासून वसले आहे.
 येथील दत्त मंदिराची महती राज्यासह संपूर्ण देशात असली तरी अलीकडच्या काळामध्ये या तीर्थक्षेत्राला बसणारा महापुराचा फटका यामुळे हे गाव बऱ्याच वेळा चर्चेत राहिले आहे. 

 तालुक्यातील 42गावांपैकी सर्वाधिक जलमय होवून बेटाचे स्वरूप प्राप्त होणारे हे गाव होय.

स्वातंत्र्यपूर्व काळातील 1914 चा महापूर, त्यानंतर 1961, 2005, 2006 गेल्यावर्षीचा प्रलयकारी 2019 च्या महापूराचा संपूर्ण गावाला फटका बसला. हे गाव बघता बघता जलमय झाले. पाच ते सहा वेळा बसणाऱ्या महापुराच्या फटक्यांमुळे येथील गावचा आर्थिक विकास हा दहा वर्षे मागे गेला हे जरी खरं असलं तरी वाढणाऱ्या महापुराच्या पाण्याच्या वाढत्या उंचीमुळे येथील ग्रामस्थांच्या हृदयाचा ठोका चुकतो हे मात्र निश्चित. सततच्या महापुरामुळे येथील दत्तमंदिर, मेवा मिठाई दुकान, शेती प्रापंचिक साहित्य, उद्योग-व्यवसाय जनजीवन यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले. महापुराच्या फटक्यामुळे संबंधितांना आर्थिक अरिष्टला सामोरे जावे लागले. कुठे स्थलांतर करायचे? या भीतीने पूरग्रस्तांच्या मनात भीतीची गडद  छाया निर्माण होते.

श्री क्षेत्र नूसिहवाङी येथे  कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली की पुढच्या भागावर असणारे राजापूर बंधारा, कर्नाटकातील हिप्परगी धरण, अलमट्टी धरण यांच्या  बॅक वॉटरचा फटका या गावाला बसतो. 

 महापूर म्हंटल की प्रत्येक महापुराची  पूर पातळी, रेषेच्या खूणा मात्र कुरुंदवाडच्या ऐतिहासिक घाटावरती आपल्याला सापडतील. गतवर्षीच्या महापुरात बऱ्याच दिवसानंतर आलेल्या मोठ्या महापुरामुळे पूरग्रस्तांचे अतोनात हाल झाले. 2006 चा महापूर 2005 च्या महापुरापेक्षा तीन ते साडेतीन फूट फुटाने कमी होता. मात्र सहा नंतर तब्बल 14 वर्षाने म्हणचे 2019 च्या आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला. रस्त्यावर तब्बल 14 ते 15 फूट पाणी राहिले. अनेकांची एक मजली, दोन मजली घरे पाण्याखाली गेली. अचानक आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले. काही मिठाई  व्यापारी यांची फर्निचर पाण्यात बुडून गेली. दत्त देवस्थानचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि शेतातील पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. अनेक  घरांची दारे, खिडक्या पाण्यात मोडून पडल्यामुळे प्रापंचिक साहित्याने महापुराच्या पाण्याची वाट धरली. अनेक पूरग्रस्त शेतकरी जनावरे यांचे स्थलांतर करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे गावातील पूरग्रस्तांची महापुराच्या पाण्याची पातळी वाढली की मनामध्ये भीतीची छाया गडद होते व काळजाचा ठोका चुकतो.

हे पण वाचा - Video - कोल्हापूर : कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ; नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली

 

 

श्रीक्षेत्र  नूसिहवाङी हे गाव कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. 2005  आणि 2006 मध्ये मी सरपंच होतो. गतवर्षी 2019 चा महापूर या तिन्ही महापुराचा मी साक्षीदार असून महापुराचे पाणी व पडलेला गाळ यामुळे दत्त मंदिर, ग्रामपंचायत, मेवामिठाई दुकाने, यांचबरोबर अनेक घरांची मोठी पडझड झालेली आहे. शेतकऱ्यांचे  गोठेे व जनावरे त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे."

- धनाजीराव जगदाळे, माजी सरपंच

 

संपादन- धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nrusiwadi village in Kolhapur is hit hardest by floods