पंधरा वर्षांत एवढी घटली बैलांची संख्या

The Number Of Bulls Has Decreased In Ajara Taluka Kolhapur Marathi News
The Number Of Bulls Has Decreased In Ajara Taluka Kolhapur Marathi News

आजरा : आम्ही कष्टाळू शेतकरी....काळी आई आमची पंढरी.... आमच्या दुनियेची दौलत सारी....ही जोडी बैलाची खिलारी... अशा अनेक मराठी चित्रपट गीतातून व्यक्त होणारी सर्जा-राजाची जोडी शेतीतून गायब होत आहे.

आजरा तालुक्‍यात गेल्या पंधरा वर्षांत सुमारे 4000 हजार इतकी बैलांची संख्या घटली आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी रस्त्यावरून बैलगाडी ओढणाऱ्या सर्जा राजाचा डौल पहावयास मिळायचा. त्यांच्या गळ्यातील घुंगराचा आवाजाने रस्ता भरून जावयाचा. हे चित्र आता दुर्मिळ झाले आहे, तर दुसरीकडे शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला प्रतिसाद मिळत आहे. तीन वर्षांत 285 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

पंचवीस तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोड्या होत्या. आता अनेक गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत बैल जोड्या राहिल्या आहेत. बैल जोडी घरी बाळगणे ही एक अभिमानाची बाब होती. चिखली गुठ्ठा, बैलगाडी शर्यतीमध्ये विजय मिळवण्याची ईर्षा काही वेगळीच होती. शर्यत जिंकणाऱ्या बैलाचे मालक हवेत फेटे उडवत होते. कालौघात हे चित्र आता ग्रामीण भागातून लुप्त होत आहे. अनेकांनी बैलजोड्या बाळगणे बंद केले आहे. 

शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांनी पॉवर ट्रिलर, ट्रॅक्‍टर खरेदी करण्यावर जोर दिला आहे. तालुक्‍यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने या तीन वर्षांत या योजनेतून 60 ट्रॅक्‍टर व सुमारे 100 पॉवर ट्रेलर व अन्य शेतीपूरक औजारे 125 शेतकऱ्यांनी खरेदी केल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

त्यामुळे बैलजोड्यांचे प्रमाण ग्रामीण भागात कमी होत गेल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर बैलजोडी बाळगणारे शौकिन देखील कमी झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारे खाद्यांच्या किंमती वाढल्या आहेत. यांसह अनेक कारणांमुळे बैलांची सख्या कमी होत चालली आहे. 2018-19 झालेल्या पशुगणनेत सुमारे साडेपाच हजार बैलांची नोंद झाल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. 

नवीन पिढी यांत्रिकीकरणाकडे वळली
नवीन पिढीला बैलजोडी पाळण्याची आवड नाही. नवीन पिढी ट्रॅक्‍टरसह यांत्रिकीकरणाकडे वळली आहे. त्यामुळे गावा-गावातून बैल जोड्या कमी होत आहेत. 
- धोंडीबा पोवार, शेतकरी, कोवाडे, आजरा 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com