कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णसंख्या घटली

The number of corona patients decreased in Kolhapur city
The number of corona patients decreased in Kolhapur city

कोल्हापूर  : कोरोना महामारीचा कोल्हापूर शहराला सर्वाधिक फटका सप्टेंबर 2020 च्या पहिल्या पंधरवड्यात बसला होता. या पंधरवड्यात शहरात सुमारे 3792 रुग्ण आढळले. तर नंतरच्या पंधरवड्यात 2123 रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्येच एकूण 5915 रुग्ण आढळले होते. ऑक्‍टोबरमध्ये मात्र या रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली. 1 ते 18 ऑक्‍टोबरपर्यंत शहरात अवघे 821 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहरातील कोरोनाची साथ आटोक्‍यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरात जुलैपर्यंत कमी असणारे कोरोना रुग्णांचे प्रमाण ऑगस्ट, सप्टेंबर 2020 मध्ये वाढले. यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण पडला. सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखाने हाउसफुल्ल झाले. अशा परिस्थितीत महापालिकेने आयसोलेशनमध्ये आणखी एक कोविड कक्ष सुरू केला. येथे सुमारे 70 हून अधिक बेडची व्यवस्था केली. जैन बोर्डिंग येथे व्हाईट आर्मीच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर उभे केले. महासैनिक दरबार येथेही क्रेडाईच्या माध्यमातून कोरोना केअर सेंटर उभे केले. सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी, सायबर येथेही कोविड सेंटर सुरू झाल्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार होऊ लागले. महापालिकेने शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटरची क्षमता वाढविली. विद्यापीठाच्या तिन्ही वसतिगृहांतही रुग्णांवर उपचार केले. या व्यतिरिक्त ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांवर घरीच उपचार केले. 

दुसरी लाट आल्यास यंत्रणा सज्ज 
महापालिकेने शहरात दुसरी लाट येऊ नये, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. "नो मास्क नो प्रवेश', हा उपक्रम राबविला आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यात जे रुग्ण संशयित म्हणून आढळतात त्यांना नागरी आरोग्य सुविधा केंद्राकडे पाठवून उपचार केले जातात. कंटेन्मेंट झोनचे पालन करण्यावरही भर दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com