
इचलकरंजी - शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येने आज त्रिशतक पार केले. आज दिवसभरात नव्याने 45 रुग्ण आढळून आले. शहरात आता रुग्णांची संख्या 330 वर पोहचली असून आणखी तीन रुग्ण दगावले असून आतापर्यंत मृताची संख्या 20 वर पोहचली आहे. 248 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
आयजीएम रुग्णालयासह कोविड केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. संसर्ग कमी होतांना दिसत नसल्यामुळे आता नविन बेड वाढविण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे रुग्णांना सेवा पुरवितांना प्रशासनावर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
शहरात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण इचलकरंजीत आढळून येत आहेत. काल शुक्रवारी तर रुग्णांचा उच्चांक झाला होता. तब्बल 88 रुग्ण आढळून आले होते. तर आज नव्याने 45 रुग्ण आढळून आले. सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या बेपारी गल्ली व लाखेनगर या दोन्ही ठिकाणी आज नव्याने प्रत्येकी सहा रुग्ण आढळून आले. खंजीरे मळा, पाटील मळा, काडापूरे तळ परिसरात प्रत्येकी तिघांचा अहवाल पॉझीटिव्ह आला. तर नविन हॉटस्पॉट ठरलेल्या बंडगर माळ परिसरात आणखी सातजणांना संसर्ग झाला आहे.
पालिका पदाधिकार्याला संसर्ग
पालिकेच्या अधिकार्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या अधिकार्याच्या तीव्र संपर्कात आलेल्या एका पदाधिकार्याच्या अहवाल आज पॉझीटिव्ह आला आहे. या पदाधिकार्यासह संबंधित खात्यातील आठजण क्वारंटाईन होते. इतरांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तिन वृध्दांचा मृत्यू
शहरात कोरोना संसर्गाने आणखी तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये शहापूर येथील 75 वर्षीय महिला, इंदिरा हौसिंग सोसायटीतील 72 वर्षाचा वृध्द व भोने माळ येथील 66 वर्षाच्या वृध्दाचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहचली आहे.
परिसर व बाधीत रुग्णांची संख्या
बंडगर माळ - 7, लाखेनगर - 6, बेपारी गल्ली - 6, खंजीरे मळा, पाटील मळा, काडापुरे तळ - प्रत्येकी 3, लालनगर -2, शेळके भवन जवळ, जवाहरनगर, राम मंदिर (गावभाग), टिळक रोड, जावईवाडी, दत्तनगर, टाकवडे वेस, संग्राम चौक, महादेवनगर, भोने माळ, विक्रमनगर, क्लॉथ मार्केट- प्रत्येक एक
कोरोना दृष्टीक्षेप...
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.