अरे बापरे! सुताचे दर घसरल्याने उत्पादनावरही परिणाम 

Oh my God! Falling yarn prices also affected production
Oh my God! Falling yarn prices also affected production
Updated on

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. परप्रांतीय कामगार मूळ गावी जाण्याच्या तयारीत असल्याने यापुढे सूतगिरणी कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे.

त्यामुळे या कामगारांना जास्तीत जास्त सुविधा देऊन मूळ गावी जाण्यापासून थांबविण्याचे प्रयत्न सूतगिरण्यांच्या व्यवस्थापनांकडून सुरू आहेत, तर दुसरीकडे सूत दर घसरले आहेत. यंत्रमाग उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे सुताला मागणी नाही. सुताचे उत्पादन काढून पुढे काय करायचे, अशा विवंचनेत सूतगिरणी व्यवस्थापन आहे. 

विविध कारणांनी सहकारी सूतगिरण्या काही वर्षापासून अडचणीत आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटाची भर पडली. कोरोना संसर्गाच्या भीतीने सूतगिरण्या बंद आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर खबरदारी घेऊन उद्योग सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील 107 पैकी पहिल्या टप्प्यात एकूण 17 सूतगिरण्या सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील 7 सूतगिरण्या सुरू झाल्या असून, काही ठिकाणी एक-दोन अथवा तीन शिफ्टमध्ये उत्पादन सुरु झाले, मात्र अपुरे मनुष्यबळ असल्याने केवळ 50 टक्के क्षमतेने उत्पादन सुरू झाले आहे, मात्र बहुतांशी सूतगिरण्यांत कामगार हे परप्रांतीय आहेत. यात बिहार, आसाम, ओरिसा व उत्तर प्रदेशमधील कामगारांचा समावेश आहे. 


बहुतांशी कामगारांनी गावी जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. हे सर्व कामगार जर गावी परतल्यास कामगारांची टंचाई जाणविण्याची भीती आहे. दुसरीकडे सूत दरातही घसरण झाली आहे. प्रतिकिलो 8 ते 10 रुपये सूत दर कोसळला आहे. त्याचा फटका सहकारी सूतगिरण्यांना बसणार आहे. कापसाच्या दरातही घसरण झाली आहे. सूतगिरण्यांचे कामकाज पूर्व पदावर येण्यासाठी सहा ते आठ महिने लागतील. 

जिल्ह्यातील सुरू असलेल्या सूतगिरण्या 
व्यंकटेश्‍वरा (हुपरी), रत्नाप्पाण्णा कुंभार (निमशिरगाव), महेश (इचलकरंजी), कोल्हापूर जिल्हा (यड्राव), महात्मा फुले (वडगाव), पार्वती (कुरुंदवाड), इंदिरा गांधी महिला (शिवनाकवाडी). 

जिल्ह्यानिहाय्य सुरू सूतगिरण्या अशा 
*कोल्हापूर-7 * सातारा -3 * अमरावती - 1 * जालना - 1 *नागपूर -4 * बीड -1 

सूतगिरण्यांमधील परप्रांतीय कामगारांना आवश्‍यक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. त्यांना गावी जाण्यापासून थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांना खर्चासाठी दररोज पगार देण्याचे धोरण काही सूतगिरण्यांत राबविण्यात येत आहे.'' 
अशोक स्वामी, अध्यक्ष ः वस्त्रोद्योग महासंघ, महाराष्ट्र राज्य 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com