कोल्हापुरात मुसळधार ; इचलकरंजीतील जूना पूल वाहतूकीस बंद

Old bridge closed to traffic at Ichalkaranji
Old bridge closed to traffic at Ichalkaranji

इचलकरंजी - शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढत होत आहे. खबरदारी म्हणून आज दुपारपासूनच जूना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासात जूना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर हातकणंगले तालुक्यात आज दिवसभरात सर्वाधिक पाऊस इचलकरंजी शहरात झाल्याची नोंद आज झाली आहे. 

शहरात गेले दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. आज सकाळ पासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. एकही मिनिट न उसंत घेता पावसाची एकसारखी रिपरीप सुुरु आहे. अधून - मधून जोरदार सळी कोसळत आहेत. यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही भागात पाणी साचल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

सतत कोसळणार्‍या पावसामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. अनेकांनी घरातून बाहेर न पडणेच पसंद केले. दुसरीकडे पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण नदीघाट परिसर पाण्याखाली गेला आहे. सकाळी 9 वाजता 53 फुटावर असलेली पाण्याची पातळी दुपारी 55 फुटापर्यंत पोहचली होती. 

जून्या पूलालगत पाणी आल्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी दुपारी 1 वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्याचे काम पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून करण्यात आले आहे. जून्या पूलावरुन हुपरीकडे जाणारी वाहतूक आता नव्या पूलावरुन सुुरु झाली आहे. पावसाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास पुढील काही तासात जूना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या हंगामात प्रथमच पूलालगत पाणी आले आहे.


तालुक्यात सर्वाधिक पाऊस इचलकरंजीत 

दिवसभरात सर्वाधिक पाऊस आज इचलकरंजीत झाला. सरासरी पाऊस सर्वाधिक हातकणंगले येथे झाला आहे. पण आज दिवसभरात 56 मिली मिटर इतक्या पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. वाठार येथे सर्वाधिक कमी 20 मिली मिटर इतका पाऊस झाला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com