लघु पाटबंधारे प्रकल्पावर फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरून मृत्यू

केरबा जाधव
Thursday, 24 December 2020

सकाळी फिरण्यासाठी गावाशेजारी असणाऱ्या लघु पाटबंधारे प्रकल्पावरती जात होते

धामोड (कोल्हापूर) : खामकरवाडी (ता.राधानगरी )येथे लघु पाटबंधारे प्रकल्पावर फिरण्यासाठी  गेलेल्या एका वृद्धाचा पाय घसरून मृत्यू झाला. आज  सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली .धोंडिबा भिवा हळदे ( वय ६२ ) असे या वृद्धाचे नाव आहे. या घटनेची राधानगरी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे .सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. 
 येथील धोंडीबा हळदे  हे सकाळी फिरण्यासाठी गावाशेजारी असणाऱ्या लघु पाटबंधारे प्रकल्पावरती जात होते. आज सकाळी साडेपाच वाजता फिरायला गेल्यानंतर त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले.  आठ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना पाण्यातून ग्रामस्थांनी बाहेर काढले .

हेही वाचा- राजू शेट्टी भडकले: सत्ता सुंदरी नसल्याने शेलार आणि टोळक्यांची अवस्था देवदास सारखी -

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने  त्याची  तपासणी करून मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये  शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा तपास राधानगरी पोलीस उपनिरीक्षक एम .एच.शेख करत आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man walk on a small irrigation project slipped and died