- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

गेल्या चार महिन्यात दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने खळबळ माजली आहे

इचलकरंजी : लाच देताना एका वीज ग्राहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पकडून देणारा सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण बुधवारी स्वतः लाच घेताना रंगेहाथ सापडला. महावितरण कार्यालयात लाचखोर चव्हाण एसीबीच्या कचाट्यात सापडला. घरगुती विद्युत कनेक्शन देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये घेताना अर्बन शाखेचा सहाय्यक अभियंता चव्हाण याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.
गेल्या चार महिन्यात दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने खळबळ माजली आहे.
चार दिवसांपूर्वी अर्बन शाखा कार्यक्षेत्रातील एका वीज ग्राहकाकडून घरगुती कनेक्शनसाठी सहा हजार रुपयांची मागणी सहाय्यक अभियंता चव्हाण यांनी केली होती. एका मक्तेदाराला वारंवार मध्यस्थी घालून पैशाची मागणी ते करत होते. मक्तेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला चव्हाण याला सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
संपादन - धनाजी सुर्वे
