टेम्पो-ट्रॅक्टर अपघातात चालक जागीच ठार ; चार जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत.

कागवाड - बेळगाव-सांगली राज्य महामार्गावर कागवाड-शिरगुप्पी दरम्यान आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टरची सोमवारी (ता. २६) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बोलेरो जीप तसेच दुचाकीला देखील या वाहनांची धडक बसली. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

परशुराम मारुती पाटील (वय ३४, रा. नरवाड, ता. मिरज) असे मयत चालकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बेळगावहून कागवाडकडे आयशर टेम्पो निघाला होता. कागवाडमधून शिरगुप्पीला १२ मजुरांना घेऊन ट्रॅक्टर निघाला होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आयशर टेम्पो चालक परशुराम मारुती पाटील याचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरमधून जाणाऱ्या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांपैकी ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मिरज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचादेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटायला कोरोनाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खोचक टोला

कागवाडचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत धर्मट्टी यांनी सहकारी काडाप्पा चांदुरे, एस. बी. मुरगूड, एन. एल. मोळे, टी. ई. सोनावणे यांच्यासह अपघातस्थळी भेट दिली. त्यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने मिरजला हलवले. कागवाड पोलिस अधिक तपास करत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident at belgaum