ऑनलाइन शाळा सॉफ्टवेअरचे कागलमध्ये अनावरण

नरेंद्र बोते
Saturday, 15 August 2020

हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे "ऑनलाईन शाळा' या सॉफ्टवेअरचे अनावरण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. सभापती विश्वास कुराडे अध्यक्षस्थानी होते. 

कागल, कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालये आजही बंदच आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागात हा उपक्रम राबविताना शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम करावे. तरच विद्यार्थी हे ज्ञान आत्मसात करू शकतील, असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. 
हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे "ऑनलाईन शाळा' या सॉफ्टवेअरचे अनावरण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. सभापती विश्वास कुराडे अध्यक्षस्थानी होते. 
शिक्षण समितीचे माजी सभापती अंबरीश घाटगे म्हणाले, ""जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समितीला काही प्रमाणात शिक्षकांच्या बदलीचे अधिकार द्यावेत.'' 
गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, उपसभापती दीपक सोनार, मनोज फराकटे, शिवानी भोसले उपस्थित होते. 
शिक्षक संदीप गुंड यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जी. बी. कमळकर, गुंड, नूतन विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश्वरे, रघुनाथ तळेकर यांचा सत्कार झाला. सुरेश कांबळे यांनी आभार मानले. विस्तार अधिकारी सारिका कासोटे, व्ही. जी. पोवार, जी. एस. पाटील, सुकुमार पाटील, रमेश जाधव, एस. के. पाटील, प्रकाश मगदूम, के. व्ही. पाटील उपस्थित होते. 

चार हजार विद्यार्थ्यांना मोबाईल देणार 
डिजिटल क्‍लासरूम या संकल्पनेत संपूर्ण महाराष्ट्रात कागल अव्वल असून, गटशिक्षणाधिकारी कमळकर यांच्या मागणीप्रमाणे 33 शाळांना ताबडतोब अँड्रॉइड टीव्ही तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसलेल्या चार हजार विद्यार्थ्यांना मोबाईल देणार असल्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली. 

संपादन - यशवंत केसरकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online school software unveiled in Kagal