सुशांतसिंह, रिया आणि कोल्हापूर ; काय आहे प्रकरण?

only one number different in riya chakravarthi and kolhapur sagar surve
only one number different in riya chakravarthi and kolhapur sagar surve
Updated on

कोल्हापूर - प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्ये प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले. त्याबातचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाले. यामध्ये जो मोबाईल क्रमांक दाखवला गेला. त्यातील साधर्म्यामुळे कोल्हापुरातील सागर सुर्वे या तरुणाला मात्र मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रोज त्याला फोन येतात. तुझा फोटो पाठव, तु कुठे आहेस असे लोक विचारतात. अखेर सागरने नंबर ब्लॉक केला तर व्हॉट्‌सऍपला मेसेज येऊ लागले. रिया चक्रवर्ती म्हणून सागर सुर्वेला मनस्ताप सोसावा लागत आहे. 


सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर देशभरात खळबळ उडाली. सुशांतच्या कुटुंबियांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. यामध्ये त्यांनी रियाचे कॉल डिटेल्स तपासले. याबाबतचे जे वृत्त वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले त्यामध्ये एक मोबाईल क्रमांकही दाखवण्यात आला. या क्रमांकामध्ये आणि कोल्हापुरातील सागर सुर्वे याच्या क्रमांकामध्ये केवळ एकाच अंकाचा फरक आहे. त्यामुळे चुकीचा क्रमांक डायल केलेले सर्व कॉल सागरला येऊ लागले.

रिया तु कुठे आहेस? तुझा फोटो पाठव अशी विचारणा समोरून झाली की सागरला प्रश्‍न पडत होता. सुरुवातीला त्याने या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर अधिकच कॉल येऊ लागले. सागरने अनोळखी क्रमांक स्वीकारणे टाळले. मग व्हॉट्‌सऍपला मेसेज येऊ लागले. सागर सरकारी कर्मचारी असून त्याला हा क्रमांका कामासाठी सुरू ठेवावा लागतो. या सर्व प्रकारामुळे सागरला मात्र मनस्तापच झाला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com