धक्कादायक ; दख्खनच्या राजाची सुरक्षा केवळ एका पोलिसावरच...

only one police for jyotiba temple security
only one police for jyotiba temple security

जोतिबा डोंगर - महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातील कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. (पन्हाळा ) या ठिकाणी असणाऱ्या जोतिबा देवाच्या मंदिराची सुरक्षा गेली अनेक केवळ एकाच पोलिसावर आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करणे गरजेचे आहे. कारण डोंगरावर दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. याठिकाणी एकच बंदुकधारी पोलीस असून एक दिवसा एक रात्री असतो. 

गर्दीच्या वेळी मात्र रविवारी व  पौर्णिमा या दिवशी जिल्ह्यातील इतर  पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त असतो. याठिकाणी दूरक्षेत्र पोलीस ठाणे आहे. या इमारतीचे कामही पूर्ण झाले  आहे पण या ठिकाणी कर्मचारीच नाहीत. हे पोलीस ठाणे  कुलूपबंद अवस्थेत आहे. 

दिवंगत गृहराज्यमंत्री आर आर पाटील यांनी सहा सात वर्षापूर्वी जोतिबा डोंगरावर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात पंचवीस कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले होते पण या आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. जोतिबा डोंगरावर वर्षाकाठी सुमारे ऐंशी ते नव्वद लाख भाविक भेट देतात. दररोज ही संख्या हजाराच्या घरात असते. रविवारी व पोर्णिमा दिवशी लाखाच्या संख्येत भाविक असतात.

त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात गरजेचे आहे. गेल्याच आठवड्यात गृहराज्यमंत्री (ग्रामीण )शंभूराज देसाई यांनी डोंगरावर भेट दिली . यावेळी जोतिबा ग्रामस्थ पुजारी सरपंच राधा बुणे , उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी येथील मंदिरात व दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात जादा पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी केली आहे. श्री देसाई यांनीही हे काम मार्गी लावण्याची ग्वाही याप्रसंगी दिली आहे.

डोंगरावर एखाद्या भाविकाची चोरी झाली . महिला भाविकाचे पर्स व दागीने चोरीला गेले तर त्यांना थेट कोडोली पोलीस ठाणे गाठावे लागते. अनोळखी भाविक पूर्णपणे गोंधळून जातात . त्यांना या भागातील फारशी माहीती नसल्याने त्यांना फार त्रास सहन करावा लागतो . असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था या दूर क्षेत्र पोलीस ठाण्याची झाली आहे . जिल्हा पोलीस प्रमुखांनी भाविक व ग्रामस्थ पुजारी यांचा हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 


 जोतिबा डोंगरावर वाढती गर्दी लक्ष्यात घेता  जादा पोलीस बंदोबस्त नेण्यासाठी प्रयत्न करू.

अनिल कदम, डीवायएसपी , शाहुवाडी विभाग


जोतिबा डोंगरावर दूरक्षेत्र पोलीस ठाणे आहे. इमारत आहे पण कर्मचारी नाहीत. ही अवस्था असून  याठिकाणी जिल्हा पोलिस यंत्रणेने हे दूरक्षेत्र पोलिस ठाणे तातडीने सुरू करावे व भाविकांची गैरसोय दूर करावी .

 शिवाजीराव सांगळे , उपसरपंच, जोतिबा डोंगर ता. पन्हाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com