गणेशमूर्ती न्यायला केवळ दोघेच या...! 

Only two come to judge Ganeshmurti ...!
Only two come to judge Ganeshmurti ...!
Updated on

कोल्हापूर : घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या संभाव्य गर्दीने कुंभार कारागीर धास्तावले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरवासीयांत त्यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला आहे. गणेशमूर्ती न्यायला कुटुंबातील केवळ दोघेच या..., सोशल डिस्टन्स ठेवून घरात प्रवेश करा.., सॅनिटायझरने हात धुतल्याशिवाय घरात प्रवेश करू नका, असा संदेश देत मूर्तीचे बुकींग करणाऱ्या कुटुंबिंयांशी त्यांचे "कम्युनिकेशन' सुरू झाले आहे. 

शहरात लाखांवर मूर्ती तयार होतात. शाडूच्या मूर्ती करणारी दोनशेवर कुटुंबे शहरात असून, मोठ्या मूर्ती करणाऱ्या कारागीरांचा आकडा अडीचशे आहे. गणेशमूर्तींच्या आगमनादिवशी कुंभार गल्ली, बापट कॅंम्पसह शहरातील ठिकठिकाणच्या स्टॉलवर गर्दीचे चित्र असते. कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढत यंदा ही गर्दी आजाराला आमंत्रण देणारी ठरणार आहे. दोन महिन्यांवर गणेश आगमन असून, कुंभार गल्ल्यांत घरगुती व मोठ्या मूर्तींचे बुकींग करण्यासाठी काही दिवसांत कुटुंबातील सदस्यांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू होणार आहे. त्यांनी थेट घरात प्रवेश न करता दारातूनच मूर्ती पाहावी, याची खबरदारी कुंभार कारागीर घेणार आहेत. 

कारागीरांनी आपापल्या घराच्या अंगणात सॅनिटायझर ठेवावे, मास्क वापरल्याखेरीज भक्तांना घरात प्रवेश देऊ नये, अशा कुंभार समाजाच्या बैठकीत कुंभार कारागीरांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. घरगुती मूर्तींसाठी बुकींग करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांचे मोबाईल नंबर कारागीरांकडे आहेत. त्यांच्याशी त्यांचा संपर्क सुरू झाला असून, गणेश आगमनाच्या आदल्या दिवशी कोणी मूर्ती न्यायला यायचे, हे त्यांना सांगितले जात आहे. 
 

कुंभार समाजाच्या बैठकीत सर्व कारागीरांना घरोघरी सोशल डिस्टन्स ठेवण्याचे बोर्ड लावा, असे आवाहन केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे कुंभार गल्ल्यांत भक्तांनी गर्दी करू नये, यासाठी आतापासूनच आम्ही प्रबोधन सुरू केले आहे. 
- एकनाथ माजगावकर, चेअरमन, कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी 


जिल्हा बंदीमुळे बाहेरच्या जिल्ह्यातील मूर्तींच्या ऑर्डर अद्याप आलेल्या नाहीत. आम्ही व्हॉटस ऍपवर मूर्तींचे डिझाईन पाठवत आहोत. काही जण पास घेऊन आम्हाला भेटायला येत आहेत. शहरातील कार्यकर्तेही अजून आमच्याकडे आलेले नाहीत. 
- अमोल माजगावकर, कुंभार कारागीर 


दृष्टिक्षेप 
- गर्दी टाळण्यासाठी खबरदारी सुरू 
- सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्कचा वापराचे आवाहन 
- शहरात तयार होतात लाखांवर मुर्ती 
- मुर्ती बनविण्यात अडीचशेवर कारागीर मग्न 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com