शिवाजी पार्क झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यास विरोध

प्रतिनिधी
शनिवार, 30 मे 2020

शिवाजी पार्क येथे कुचीकोरवी, गोसावी व सोनझरी समाजाची घरे असणारी वसाहत आहे. या वसाहतीत अतिक्रमणे झाल्याने आज महापलिकेचे ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,अतिक्रमण विभागाचे पथक येथे दाखल झाले. सोबत मोठा पोलिस फौजफाटा होता. कारवाई करण्यासाठी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह येथे पथक दाखल होताच, झोपडपट्टीधारकांनी एकच गर्दी केली

कोल्हापूर. शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा मोठा पोलिस फौजफाटा घेउन आज झोपडपट्टीत गेली. यावेळी महापालिका अधिकारी व झोपडपट्टीधारक यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर सामंज्यस्याने अतिक्रमणे काढून घेण्याचा तोडगा निघाल्यानंतर महापलिकेचे अतिक्रमण पथक व पोलिस फौजफाटा माघारी फिरला.अतिक्रमणाबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून मार्किंग करुन दिले जाणार आहे.त्याप्रमाणे ही अतिक्रमण काढून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

शिवाजी पार्क येथे कुचीकोरवी, गोसावी व सोनझरी समाजाची घरे असणारी वसाहत आहे. या वसाहतीत अतिक्रमणे झाल्याने आज महापलिकेचे ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,अतिक्रमण विभागाचे पथक येथे दाखल झाले. सोबत मोठा पोलिस फौजफाटा होता. कारवाई करण्यासाठी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह येथे पथक दाखल होताच, झोपडपट्टीधारकांनी एकच गर्दी केली. यावेळी अधिकारी आणि झोपडपट्टीधारक यांच्यात वादावादी झाली.या वादावादीनंतर प्रकरण तोडगा काढण्यावर आले. अतिक्रमणे काढून घेतली जातील,असे नागरिकांनी सांगीतले.त्याप्रमाणे महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना मार्किंग करुन देण्याचा तोडगा काढला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, हर्षजित घाटगे आदीनी झोपडपट्टीधारकांशी चर्चा केली.यावेळी राष्ट्रवादीचे अमोल माने, राष्ट्रवादी कॉग्रेस भटक्‍या जाती सेलचे अध्यक्ष किशोर माने आदीसह झोपडपट्टीतील अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to removal of encroachments in Shivaji Park slum