गणेश आगमनावेळी गर्दी  टाळण्यासाठी मैदांनांचा पर्याय  

Option of grounds to avoid crowds during Ganesh arrival
Option of grounds to avoid crowds during Ganesh arrival
Updated on

कोल्हापूर :  प्लाझ्मा, रक्तदान शिबरिासह शासकीय यंत्रणेला व्हेंटिलेटर भेट अशा विधायक उपक्रमातून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून गणेश मंडळांना केले जात आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. गणेश आगमनावेळी होणाऱ्या गर्दीवर मैदानाचा पर्याय पुढे आला आहे. त्यावर गुरुवारी संबंधित घटकांची बैठक घेतली जाईल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 
कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंडळांनी पुढाकार घेतला आहे. शासनानेही या उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेकडून केली जाणार आहे. नियमावलीत गणेश मूर्तींच्या उंचीपासून सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून मिरवणूक, देखावे आदींवर मर्यादेचे पालन मंडळांना करावे लागणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. 
देशमुख यांनी शहरातील तालीम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चार दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. आजही त्यांनी इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, हुपरी या गावांतील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी कोरोनाच संकट विचारात घेऊन मंडळांनी प्लाझ्मा दान, रक्तदान यासारख्या शिबिराचे आयोजन करा. गरजू मुलांना दत्तक घ्या, वैद्यकीय यंत्रणेला ऑक्‍सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर भेट देण्याचे विधायक उपक्रम राबवा, असे आवाहन केले. यावेळी असे उपक्रम राबविण्याची इच्छा अनेक मंडळांनी व्यक्त केली. 

"एक गाव एक गणपती'ची सक्ती नाही 
"एक गाव एक गणपती'ची सक्ती केलेली नाही, तरीही या उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर मंडळे सहभागी होत आहेत. अनेक गावांनी कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचेही पोलिस यंत्रणेला कळविले आहे. 

या मैदानांचा पर्याय 
शहरातील गणेश आगमनादिवशी पापाची तिकटी, गंगावेस, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंप आदी भागांत गर्दीचे नियोजनसाठी परिसरातील मैदानाचा पर्याय पुढे आला आहे. सासने मैदान, दुधाळी, गांधी मैदान, पेटाळा अशी मैदाने उपलब्ध आहेत. याबाबत संबंधित घटकांशी गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


जिल्ह्यातील गावे - 1029 
 गणेश मंडळे - 4576 
एक गाव एक गणपतीत सहभागी गावे - 303 
सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करणारी गावे - 97 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com