कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; वाचा काय सुरू काय बंद?

order of collector of kolhapur corona precautions new regulation declared
order of collector of kolhapur corona precautions new regulation declared

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुचनांना अनुसरून आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवेखाली औषध दुकानांसह किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकानांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (रेल्वे, टॅक्‍स, रिक्षा आणि सार्वजनिक बस) सुरूच राहणार आहेत. मद्य विक्रीसह इतर व्यवसाय मात्र 30 एप्रिल पर्यंत दिवसभर सुद्धा बंदच ठेवावे लागणार आहेत. 

राज्य सरकारने काल शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण संचारबंदी तर सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत जमाव बंदी व त्यांनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात पर्यंत संचार बंदी जाहीर केली आहे. त्याच आधारे जिल्ह्यात ही हे आदेश आज मध्यरात्री पासून लागू झाले. कोणत्या सेवा सुरू राहणार, व कोणत्या बंद या संदर्भातील मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी जाहीर केल्या. 

वृत्तपत्र सुरूच राहणार 

प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार वृत्तपत्रांची छपाई व वितरण सुरूच राहणार आहे. सर्व वृत्तपत्र कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर निकषाप्रमाणे लसीकरण पूर्ण करावे, वृत्तपत्र घरपोच करणाऱ्या विक्रेत्यांनी पंधरा दिवसांसाठी कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र जवळ ठेवावे, असे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी दहा एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे. 

हे राहणार सुरू 

सर्व रुग्णालये, औषध दुकाने, औषध निर्मिती कारखाने, आरोग्य विमा कार्यालये, भाजीपाला, किराणा माल दुकानदार, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने, रेल्वे, टॅक्‍सी, ऍटो रिक्षा, सार्वजनिक बसेस. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून देण्यात येणाऱ्या मान्सून पूर्व उपक्रम व सेवा, आणि सर्व सार्वजनिक सेवा, माल व वस्तू वाहतूक, शेती संबंधित सर्व सेवा, ई-कॉमर्स, अत्यावश्‍यक सेवेसंदर्भातील सर्व प्रकारचे माहिती तंत्रज्ञान उद्योग, सेवा स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे प्राधिकारणाद्वारे निश्‍चित केलेल्या अत्यावश्‍यक सेवा. 

हे राहणार बंद  

सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने (सोमवारी ते शुक्रवारी ) रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान बंद राहणार इतरवेळी सुरू राहतील. 
अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स्‌, पूर्ण दिवस बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृह, प्रेशा गृहे, मनोरंजन पार्क, सर्व खासगी कार्यालये, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क बंद राहणार 

रेस्टारंट, बार, हॉटेलसाठी  

- हॉटेल मधील वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठी रेस्टारंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत पार्लस सुविधा, घरपोच सेवा सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. कोणत्याही नागरिकास सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टारंट आणि बार मध्ये जाता येणार नाही. 

- घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लसीकरण पूर्ण करावे. लसीकरण झाले नसल्यास पंधरा दिवसांसाठी कोरोनाचे व्हीई प्रमाणपत्र जवळ बाळगावे 

धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे  

सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक स्थळांमध्ये सेवा करणारे सेवेकरी सर्व धार्मिक विधी पार पाडतील. भक्तांना प्रवेश असणार नाही. 

शाळा महाविद्याये 

सर्व शाळा-महाविद्यालये बंद राहतील. दहावी आणि बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट असेल. परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. सर्व प्रकारचे खासगी कोचिंग क्‍लासेस बंद राहतील. 
 
कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. लग्न समारंभांना जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित असतील. अंतयात्रेसाठी जास्ती जास्त वीस लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 

खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी खाद्य पदार्थ खाण्यास देवू नये. घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ असेल. 

सर्व केशकर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील. 

कारखाने व उत्पादक अस्थापना यांनी कर्मचाऱ्यांना शरीराचे तापमान तपासूनच प्रवेश द्यावा. लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. पाचशे पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या कारखान्यांनी स्वतःचे अलगीकरण केंद्र स्थापन करावे, गर्दीही करू नये, कर्मचारी कोविड पॉझिटीव्ह आल्यास कारखाना किंवा अस्थापना बंद ठेवावी, कोविड पॉझिटीव्ह आल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com