विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी निघाले आदेश

संदीप खांडेकर
Thursday, 6 August 2020

खा.संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती मंत्री पटेल यांची भेट...

कोल्हापूर - विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी तातडीने केंद्रिय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्याचे आज आदेश दिले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पटेल यांची भेट घेऊन पडझड रोखण्यासाठी तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली. त्यावर पटेल यांनी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले.

संभाजीराजे यांनी स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्यासह पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी सूचना केली.

वाचा - चंद्रकांतदादांचे दोन चेहरे, त्यांनी मुक्त चिंतन करावे 

केंद्रिय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत तत्काळ निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orders were issued to stop the fall of Vijaydurg fort