हुपरीच्या तरुणाईचा  "जबाबदार' अमेरिकेत! आठ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल नामांकनं

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

अमेरिकेतील युव्हीटी सिनेप्लेक्‍स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता त्याचे ऑफिसिअल स्क्रिनिंग होणार आहे. 

कोल्हापूर :  लॉकडाउनच्या काळात विविध अडचणींचा सामना करत हुपरी (ता. हातकणंगले) येथील तरुणाईने साकारलेला "जबाबदार' हा लघुपट आता आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पोचला आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या काळातही काही दिवस प्रत्येकाने मास्क बंधनकारकच केला पाहिजे, असा संदेश या लघुपटातून दिला आहे. किरण खड्ड, ओंकार पोतदार, रवी पायमल यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. 

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मध्यवर्ती विषयावर लघुपट बेतला आहे. 26 जानेवारीला तो प्रदर्शित झाला आणि त्यानंतर इटली, जपान, अमेरिका आदी आठ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलची नामांकनं या लघुपटाने मिळवली आहेत. अमेरिकेतील युव्हीटी सिनेप्लेक्‍स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता त्याचे ऑफिसिअल स्क्रिनिंग होणार आहे. 

हेही वाचा- Sakal News Viral : ब्लड कॅन्सरने पिडीत असलेल्या सिद्धीच्या मदतीला आले दातृत्वाचे हजारो हात !

कोरोनावरील लघुपट "ओटीटी'वर 

रवींद्र पायमल, रेणू रांगोळे, महादेव केरू, सायली कुळकर्णी, शरद पोवार आदींच्या लघुपटात भूमिका आहेत. किरण खड्ड यांचे लेखन व दिग्दर्शन आहे. ओंकार पोतदारचे छायांकन व संकलन असून, सूरज गवळीचे संगीत आहे. विजय रजपूत, अविनाश शिंदे यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.  

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the OTT platform UVT Cineplex in the US jawabdar film entertainment marathi news