बापरे...कोल्हापूर जिल्ह्यातील 868 पैकी 269 रुग्ण गडहिंग्लज उपविभागात

Out Of 868 Patients In Kolhapur District, 269 Are In Gadhinglaj Sub-Division Kolhapur Marathi News
Out Of 868 Patients In Kolhapur District, 269 Are In Gadhinglaj Sub-Division Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : गेल्या दहा दिवसात गडहिंग्लज उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्‍यात तब्बल 32 टक्के रुग्ण आढळले आहेत. 868 पैकी 269 रुग्ण या उपविभागात आहेत. सुरूवातीच्या टप्यात जेमतेम असणारी संख्या आता धोकादायकरित्या वाढू लागली आहे.

नेसरी, अडकूर, कोळिंद्रे, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा शहरासह प्रमुख गावातील बाजारपेठा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

गडहिंग्लज हे या उपविभागातील अत्याधुनिक वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील पाच कर्मचारीच बाधीत झाले आहे. यात एका डॉक्‍टरचाही समावेश आहे. गेले तीन महिने ग्रामीण भागात रुग्ण असले तरी शहरात मात्र याची लागण झालेली नव्हती.

आजऱ्यातील भादवण परिसरातही वैद्यकीय क्षेत्रातीलच महिलेला लागण झाली. मुळातच तपासणीच्या निमित्ताने अनेकजण या रुग्णांच्या संपर्कात असल्याने सामुहिक संसर्गाच्या भितीचे वातावरण आहे. चंदगड तालुक्‍यातील अडकूर परिसरही हॉटस्पॉट ठरत आहे. एका पाठोपाठ आढळणाऱ्या रूग्णामुळे या ठिकाणीही भितीचे चित्र आहे. आजरा तालुक्‍यात कोळिंद्रे आणि उत्तूर या दोन जिल्हा परिषद मतदार संघात रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी पाठोपाठ रुग्णांच्या संख्येत गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्‍याने स्थान मिळविले आहे. रोजच वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे तीन महिन्यानंतर पुन्हा बाजारपेठा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गडहिंग्लजने तब्बल पाच दिवस, तर आजरा, नेसरी, अडकूर, चंदगड अशा मुख्य बाजारपेठा असलेल्या केंद्रांनी लॉकडाऊन करुन कोरोनाला लगाम घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यातच बाहेरून येणाऱ्यांना आता होम क्वॉरंटाईन केले जात असल्याने अधिक धोका मानला जात आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com