24 जागांसाठी आले 4 हजारावर अर्ज; पदरी पडली निराशाच 

Over 4,000 applications were received for 24 seats
Over 4,000 applications were received for 24 seats

कोल्हापूर : जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीकडे विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी चार हजारांवर अर्ज आले आहेत; मात्र ही भरती प्रक्रियेची मुदत संपल्याचे तसेच ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे सांगत प्रस्तावाला जिल्हा सहकार उपनिबंधकांनी परवानगी नाकारली. त्यामुळे हजारो अर्जदारांची निराशा होण्यासह मागील दाराने 24 जागांच्या भरतीसाठी काही संचालकांनी लावलेला जोर फुसका बार ठरला आहे. 

बाजार समितीत 24 जागांवर भरती होणार होती. त्यासाठी जाहिरातीव्दारे अर्ज मागवले होते. यात 12 लिपिक, 1 पर्यवेक्षक, 2 शिपाई, 9 वॉचमन या पदासाठी अर्ज आले होते. भरतीसाठी पणन संचालकांकडून नियमावली दिली आहे. त्यानुसार गतवर्षी भरती प्रक्रियेला परवानगी मिळाल्यानंतर सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र मध्यंतरी आचारसंहितेचे कारण देत भरती झाली नाही. त्यानंतर नवीन जाहिरात देऊन प्रक्रिया राबविली. यात पणन संचालकानी दिलेल्या सूचनांचे पालन झालेले नाही. त्यामुळे ही भरती नियमबाह्य ठरू शकते तसेच सहा महिन्यांचा कालावधीत संपलेला असल्याने भरतीला मुदतवाढ नाही, असे कारण देत भरतीचा प्रस्ताव नाकारला आहे. 

दरम्यान, ही भरती करण्यासाठी काही संचालकांसह जिल्ह्यातील नेत्यांनी जोर लावला तर काही संचालकांनी कांही उमेदवारांना भरतीचा शब्द दिला होता. त्याद्वारे काही संचालक परिचितांना स्थान देण्याच्या प्रयत्न होते. यातून संचालकांतच दोन गटही पडले. यात 13 संचालक भरती व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. तर दोन तटस्त, चार नियमबाह्य भरतीच्या विरोधात होते. त्यामुळे अंर्तगत धुसफूस वाढीस लागली आहे. अशात बाजार समितीकडे सध्या चर्तुथश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रलंबित आहे. याबाबत एका कर्मचाऱ्यांने कामगार न्यायालयात दावाही दाखल केला आहे,. अशी माहिती सुत्रांकडून दिली. 

न्यायालयाच्या आदेशाचे काय? 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पणन संचालकांच्या परवानगीशिवाय भरती प्रक्रिया करायची नाही, असे असताना पणन संचालकांच्या परवानगीशिवाय 24 जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे. नवीन पद भरती झाली तर बाजार समितीच्या खर्चाचा बोजा वाढणार आहे. नियमबाह्य भरती होऊ नये त्याचा कोणी लाभ उखळू नये असे मानणाऱ्या चार संचालकांचा एक गट भरतीला विरोध करीत आहे. 

दृष्टिक्षेप 
- 24 जागांसाठी होणार होती भरती 
- जाहीरातीद्वारे मागितले होते अर्ज 
- नियमबाह्य ठरवत भरतीचा प्रस्ताव नाकारला 
- 13 संचालक होते भरतीसाठी प्रयत्नशील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com