व्हाईट आर्मीच्या अन्नछत्राचा पाच लाखांवर लोकांनी घेतला लाभ

व्हाईट आर्मीच्या अन्नछत्राचा पाच लाखांवर लोकांनी घेतला लाभ
Updated on

कोल्हापूर ः लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे जेवणाविना हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी गजेन्द्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, कोल्हापूर महापालिका, क्रिडाई व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने अन्नछत्र उभारले. हे अन्नछत्र सलग त्रेपन्न दिवस सुरू असून शहर आणि परिसरातील सकाळी व रात्री असे दोन्ही वेळी मिळून पाच लाख चार हजार 36 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. 
व्हाईट आर्मीच्या या उपक्रमासाठी काही लोकांनी नाव न सांगता मदत केली. त्याच्याही पुढे जावून व्हाईट आर्मीच्या जवानांनी अखंडपणे रात्रंदिवस विनामोबदला ही सेवा दिली आहे. अंबाबाईच्या करवीरनगरीत अशा आपत्तीवेळी एकही व्यक्ती, कुटुंब, लहान मुल उपाशी झोपत नाही. व्हाईट आर्मीसारखे अनेक जण मदतीसाठी तत्पर आहेत. छत्रपती शाहूनगरी सामाजिक कार्यात व विशेषतः माणुसकीमध्ये जगात भारी आहे. अजूनही अन्नछत्र सुरूच राहणार आहे. ज्यांना या उपक्रमाला मदत करायची आहे, त्यांनी व्हाईट आर्मीशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. रोकडे यांनी केले आहे. दरम्यान, आज दिवसभरात तीन हजार 229 व्यक्तींना या अन्नछत्राचा लाभ मिळाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kagal Woman Dead Body News
Kolhapur  Paper Leak
Satej Patil statement on Gokul election
Pune MLC Election 2026 MVA seat
Marathi News Esakal
www.esakal.com