कोल्हापुरात आठवड्यात दोन लाखांवर पर्यटक

 Over two lakh tourists visit Kolhapur every week
Over two lakh tourists visit Kolhapur every week
Updated on

कोल्हापूर  ः कोरोना संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरी राहिलेला बहुतांशी कौटूंबिक वर्ग पर्यटनाला निघाला आहे. यातील बहुतांशी पर्यटक कोल्हापुरात एक मुक्कम करीत गोवा, कोकणाकडे जात आहे. परिणामी कोल्हापूर शहरात एका आठवड्यात दोन लाख पर्यटकांची येथे हजेरी लागत आहे. त्यातून हॉटेल व्यवसायाच्या उलाढालीला बळ मिळाले आहे.

यातून आठ महिने बंद राहिलेल्या व्यवसायाला अर्थिक आधार मिळण्यास मदत झाली आहे. 
दिड महिन्यापासून पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात सुरू झाला अद्यापि परदेशी विमान सेवा बंद आहे. रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे बहुतांशी पर्यटक खासगी चार चाकी गाड्या किंवा आराम बस, एसटी बसचा आधार घेत पर्यटनास कोल्हापूरमध्ये आले. यात बहुतेकांनी एक दिवस कोल्हापूर बघून पुढे कोकण, गोव्याकडे जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार रोज नव्या कौटूंबीक पर्यटकांचा ओघ शहरात येत आहे. शनिवार, रविवार व नाताळनंतरच्या सलग सुट्टीच्या काळात सर्वाधिक पर्यटक येथे येत आहेत. यातील जवळपास 30 टक्के पर्यटकांचा एक दोन दिवसाचा मुक्काम कोल्हापूरात राहीला तर बहुतांशी पर्यटक एका दिवसात पुढील प्रवासाला निघाले. या कालावधीत सर्वाधिक पसंती कोल्हापुरातील खाद्य पदार्थाला होती. त्यामुळे हॉटेल समोर पर्यटकांच्या गाड्याची गर्दी दिसत आहे. 
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उज्वल नागेशकर म्हणाले की, "" पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला थोडा आधार लाभला आहे. मात्र, एका आठवड्यात एका लाखापर्यंत पर्यटक येथे येतात. सुट्टीच्या काळात दोन ते अडीच लाख पर्यंत पर्यटक कोल्हापूराला भेट देतात. त्या सर्वांचा चहा, नाष्ठा जेवण येथे होते त्यातून अर्थिक हातभार लाभतो आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी दिसते हे खरे आहे.'' 
बहुतांशी पर्यटक येथे येतात एका दिवसात निघून जातात. त्यामुळे हॉटेल समोर गर्दी दिसत असली तरी रूम्स घेण्याचे प्रमाण अद्यापि कमीच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास हॉटेल व्यवसायात 3 हजारांवर उंची रूम्स आहेत. मात्र 25 ते 40 टक्केच रूम्स बुकींग झाले. सद्या लग्न सराई सुरू आहे. त्यानिमित्तानेही बाहेरगावचे पाहुणे कोल्हापूरात येत आहेत. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने हॉटेल्स रूम्स बुकींग झाल्यास व्यवसायाला आणखी आधार होऊ शकतो. असेही श्री. नागेशकर यांनी सांगितले. 

चौकटी 
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती 
कोल्हापूर खाद्य संस्कृती मसांहारी जेवण, मिसळसह अन्य पदार्थ आहेत. त्याला पर्यटकांची पसंती आहेत याशिवाय इंडीयन, साऊथ इंडीयन, इटालियन पदार्थापासून ते तंदुरी चिकन पर्यंतचे चविष्ठ खाद्य पदार्थ खाण्यासाठी कोल्हापूराच्या हॉटेल्स पसंती आहे परिणामी गेल्या ती दिड महिन्यात हॉटेल समोर गर्दी वाढत दिसत आहे. 

अंबाबाई दर्शनासाठी गर्दी 
करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी सलग तीन दिवस गर्दी कायम राहिली आहे. शुक्रवारपासून मंदिरात मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसात पस्तीस हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले तर आज साडेसतरा हजारहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. दरम्यान, महालक्ष्मी अन्नछत्रातही भाविकांची संख्या वाढत असून रोज दोन हजारांवर भाविक अन्नछत्राचा लाभ घेत आहेत. 
- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com