पंचगंगाप्रेमींनी केला, घाट परिसर स्वच्छ

प्रतिनिधी
शनिवार, 30 मे 2020

फिरायला येणाऱ्यांनीही लावला हातभार 
काही सहकाऱ्यांसह श्री. पाटील स्वच्छता करत होते. त्यांची ही धडपड बघून तेथे फिरायला येणाऱ्या काहीजणांनी त्याला हातभार लावला. कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर असे सर्व नियम पाळून पंचगंगा वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला. लॉकडाउनमुळे का होईना, पंचगंगा नदी व परिसर स्वच्छ झाला. नदीचे हेच सौंदर्य टिकविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असेच जणू या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

कोल्हापूरः लॉकडाउन काळात पंचगंगा नदीचे पाणी स्वच्छ व नितळ झाले आहे. इतर वेळी नदीच्या पाण्यात निर्माल्य, कचरा, प्लास्टिक टाकले जात होते. ते लॉकडाउन दरम्यान पूर्णतः बंद झाले. त्यामुळे पंचगंगा नदीने पूर्णतः मोकळा श्‍वास घेतला; परंतु काही तळीरामांनी नदीकाठच्या परिसराला "ओपन बार'चे स्वरूप दिले. त्यामुळे हा परिसर बाटल्या, प्लास्टिकने व्यापून गेला. स्वच्छ झालेला नदीकाठ पुन्हा कचऱ्याचे आगर बनला. 
रोज सकाळी नदीघाटावर फिरायला येणाऱ्या गिर्यारोहक विजय पाटील, स्वराज्य पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचगंगा नदीकाठाची ही दयनीय अवस्था पाहिली व पहाटे सहा वाजताच येथील बाटल्या गोळा करायला सुरवात केली. नदीकाठच्या परिसरात पडलेल्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, स्नॅक्‍सचे रॅपर, कॅरिबॅग, पत्रावळ्या, ग्लास, सिगारेटची रिकामी पाकिटे गोळा करून एका ठिकाणी एकत्रित केली. या गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्‍न समोर असतानाच वृक्षप्रेमी ग्रुपचे तात्या गोवावाला व अमित देशपांडे यांनी हा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली. स्वच्छता निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी त्वरित दोन कर्मचाऱ्यांसह येऊन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. 

फिरायला येणाऱ्यांनीही लावला हातभार 
काही सहकाऱ्यांसह श्री. पाटील स्वच्छता करत होते. त्यांची ही धडपड बघून तेथे फिरायला येणाऱ्या काहीजणांनी त्याला हातभार लावला. कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर असे सर्व नियम पाळून पंचगंगा वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला. लॉकडाउनमुळे का होईना, पंचगंगा नदी व परिसर स्वच्छ झाला. नदीचे हेच सौंदर्य टिकविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असेच जणू या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchganga lovers did, the ghat area is clean