...तर पंचगंगा, भोगावती नदीला महापूर येणार नाही 

Panchganga river will not be flooded
Panchganga river will not be flooded
Updated on

राशिवडे बुद्रुक : गतवर्षीच्या महाप्रलयंकारी पुराचा अनुभव घेता यावर्षी कोणत्याही परिस्थितीत भोगावती व पंचगंगेला महापूर येणार नाही यासाठीचे नियोजन राधानगरी तालुक्‍यातील धरणावर केले जात आहे. महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून याची आखणी केली जात असून तिन्ही धरणांमध्ये पावसाच्या मर्यादा लक्षात घेऊन टप्याटप्याने पाणी संचय केला जाणार आहे. 

राधानगरी, तुळशी आणि काळम्मावाडी या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे राधानगरी तालुका पाण्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. ही तीनही धरणे भरल्यानंतर दूधगंगा; भोगावती आणि तुळशीला विसर्ग सुरू केल्यास महापुराची स्थिती निर्माण होते. गतवर्षी सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस आणि तुडुंब भरलेल्या धरणातून येणारे पाणी यामुळे प्रलयंकारी स्थिती निर्माण झाली होती. आजवरच्या सर्व इतिहासाच्या पुररेषा मोडून गेल्यावर्षी पाणी गावागावांमध्ये आणि कोल्हापूर शहरांमध्येही शिरले होते. लोक संकटात सापडले होते. त्याचा विचार करून पाटबंधारे विभागाने याची आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. 

जूनअखेरपर्यंत 40 टक्के पाणीसाठा राहील असे नियोजन निश्‍चित केले व त्यानुसार नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात ठेवून धरणांमधून विसर्ग चालू ठेवला होता. जुलैअखेर 60 टक्के पाणीसाठा व त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पर्जन्यमानाचा विचार करून 100 टक्के संच निश्‍चित केला जाणार आहे. हे धोरण राधानगरी धरणाच्या बाबतीत निश्‍चित केले असले तरी काळम्मावाडी धरणाची क्षमता मोठी असल्याने या धरणात जुलैअखेर 70 ते 75 टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. 

...तर पूरस्थिती आटोक्‍यात 
काळम्मावाडीचे पाणी कर्नाटकात जाते. तरीही अतिरिक्त विसर्ग सुरू केल्यास सरवडे परिसरातील गावांना झळ पोचते. परंतू राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर स्वयंचलित दरवाज्यातून होणारा विसर्ग आणि अधिक पाऊस पडल्यास मुख्य दरवाजे खुले करण्याची येणारी वेळ येते. यामुळे भोगावती आणि साहजिकच पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पूर येतो. याचा काठावरील गावांना, कोल्हापूर शहरासह इचलकरंजीलाही फटका बसतो. यासाठी केवळ राधानगरी धरणातील पाणी नियंत्रण ठेवल्यास पूरस्थिती आटोक्‍यात येते याचा अभ्यास करून यंदा हे नियोजन आखले आहे. 

गतवर्षीचा प्रलय विचारात घेऊन पाणी क्षमता किती असावी आणि त्यानुसार विसर्ग किती ठेवावा याचे नियोजन आतापासूनच केले आहे. त्यामुळे निश्‍चितच महापुराचा फटका बसणार नाही अशी खात्री आहे. 
- मीना निंबाळकर, तहसिलदार, राधानगरी 


दृष्टिक्षेप 
- अलिकडच्या पावसामुळे तिन्ही धरणांतून विसर्ग 
- महसूल व पाटबंधारेकडून आखणी 
- राधानगरीसह तीन धरणांबाबत नियोजन 
- जुलैअखेर काळम्मावाडीत 75 टक्के पाणीसाठा ठेवला जाणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com