कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिल रायडर्स फाऊंडेशनतर्फे 'पन्हाळा ते पावनखिंड' पदभ्रमंती मोहीम स्थगित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनासी झालेल्या चर्चेअंती फाऊंडेशनच्या बैठकीत सर्वांनुमते स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील व विनोद कांबोज यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पत्रकात म्हटले आहे की, गेली ३५ वर्षांहून अधिक वर्षे 'पन्हाळा ते पावनखिंड' मोहीम आयोजित केली जाते. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधून शेकडो शिवभक्त, निसर्गप्रेमी ट्रेकर्स मोहिमेत सहभागी होतात. दहा वर्षांपासून प्रतिवर्षी तीन मोहिमांचे आयोजन केले जाते. मोहिमेत प्रतिवर्षी साडेचार ते पाच हजार युवक-युवती सहभागी होतात.
यंदा कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातून सुरु होऊन जास्तीत जास्त ७५% भाग शाहूवाडी तालुक्यातून जातो. पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. याउलट शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. मोहीम मार्गावरील बऱ्याच वाड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.
बैठकीस युवराज साळोखे, चंदन मिरजकर, सागर बगाडे, स्नेहल रेळेकर, हृषीकेश केसकर, सुरज ढोली, सचिन नरके, प्रसाद कदम, सागर डकरे, प्रताप माने, विनोद आडके, परेश चव्हाण, विनायक कालेकर, जयदीप जाधव, पंढरीनाथ जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.