पन्हाळ्याचा सहायक फौजदार जाळ्यात केली होती ही डिमांड 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

दाखल गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेताना कारवाई

कोल्हापूर : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी २२ हजारांची लाच घेताना पन्हाळा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार उमेश आनंदराव जाधव (वय ५४, रा. शुक्रवार पेठ, कुंभार गल्ली) आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. 

हेही वाचा-बापरे हा काय प्रकार? बावीस दिवस उपचार घेऊन बरा झालेल्या तरूणाला तो फोन आला अन् पायाखालची जमीनच सरकली -

पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी ही माहिती दिली. तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर पन्हाळा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार उमेश जाधव याच्याकडे होता. त्याने या कामात तक्रारदाराला मदत करण्यासाठी सुरवातीला ३० हजारांची तडजोडी अंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी याची माहिती लाचलुपत प्रतिबंधक  विभागाला दिली.

हेही वाचा- ‘मी चुकूच शकत नाही,  शौमिका यांच्या टि्वटची राजकीय क्षेत्रात चर्चा -

विभागाने याची पडताळणी केली. त्यानंतर आज रात्री पथकाने महाद्वार रोड, कसबा गेट पोलिस चौकीजवळ सापळा रचला. येथे तक्रारदारांकडून २२ हजारांची लाच घेताना संशयित जाधवला पकडले. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलिस नाईक शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, पोलिस कॉस्टेबल मयूर देसाई यांनी ही कारवाई केली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhala assistant magistrate caught in trap