कोल्हापूर - पन्हाळा तालुका बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

 राजेंद्र दळवी
Monday, 14 September 2020

लॉकडाऊन पासून पन्हाळगडावरील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला.

आपटी -   देशात कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन चालू झाल्यापासून मार्च, एप्रिल आणि मेच्या १२ तारखेपर्यंत पन्हाळा तालुका कोरोना मुक्त  राहिला होता. तर मे आणि जून मध्येही तालुक्यातील रुग्णांची संख्या इतर  तालुक्यांच्या तुलनेत तशी नगण्यच होती. पण जुलै महिन्या पासून शासनाने देश  अनलॉक करण्याचे धोरण अवलंबले व लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. अन् पन्हाळा तालुक्यातील गावागावात रुग्ण सापडू लागले. 

काल (ता. १३) अखेर  तालुक्यातील रुग्ण संखेने १३९७ पर्यत मजल मारली. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ५० -६० रुग्ण सापडू लागल्याने पन्हाळा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट  बनू लागला आहे.

लॉकडाऊन पासून पन्हाळगडावरील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. तर श्री क्षेत्र जोतीबा वरील मंदिरच बंद असल्याने तेथील आर्थिक उलाढाल थांबली. तसेच तालुक्यातील अन्य गावातील लहान मोठे उद्योग बंद झाले. त्यामुळे या सर्वावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील जनतेवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्यामुळे कुटुंबाचा 
चरितार्थ चालविण्यासाठी लोक रोजगाराच्या शोधात बाहेर पडू लागले. त्यातून तालुक्यातील लोकांचा शहराशी संपर्क वाढला. तालुक्यातील कोडोली, कळे, पोर्ले, कोतोली सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढली. सुरवातीला तालुक्यात कोरोना रुग्णांची  संख्या कमी होती. पण विना मास्क फिरणाऱ्यांमुळे समूह संसर्गाला सुरवात 
झाली. मला काय होतय म्हणत बिनधास्त फिरणारेच खऱ्या अर्थाने समूह  संसर्गाला कारणीभूत ठरले आहेत. त्यातच काही गावातील डॉक्टरच कोरोनाची  शिकार ठरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे इतर आजारावर उपचार करण्यास ग्रामीण भागातील डॉक्टर टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे
 तालुक्यातील इतर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने परिस्थितीबिकट बनू लागली आहे.

 पन्हाळा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसा पासून दररोज ५० -६० रुग्णसापडू लागले आहेत. या सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे तालुक्याची रुग्ण संख्या काल अखेर १३९७ पर्यत पोहचली आहे. ही वाढणारी रुग्ण संख्या  आटोक्यात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला साथ देणे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले तरच पन्हाळा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट
 बनण्यापासून वाचू शकेल.

तालुक्यात अशी वाढली रुग्ण संख्या

१२ मे ला पहिला रुग्ण सापडल्यानंतर मे अखेर एकूण रुग्णसंख्या २४  जूनपर्यंत ५ रुग्णांची वाढ. जून अखेर एकूण रुग्ण संख्या २९
   जुलै मध्ये २४१ रुग्णांची वाढ, जुलै अखेर एकूण रुग्णसंख्या २७०,  ऑगस्ट मध्ये ६४४ रुग्णांची वाढ ऑगस्ट अखेर एकूण रुग्णसंख्या ९१४    सप्टेंबर मध्ये गेल्या १३ दिवसात तब्बल ४८३  रुग्ण वाढले असून १३  सप्टेंबर अखेर एकूण रुग्णसंख्या १३९७ इतकी झाली आहे.

कोरोनामुक्तीचे प्रमाण जास्त तर  कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 
२.९३ % टक्के. एकूण कोरोना बाधित १३९७, पैकी कोरोना मुक्त ९७५, कोरोना मुळे मयत ४१ तर १३ सप्टेंबर अखेर उपचार घेत असलेले अॅक्टीव रुग्ण ३८१

हे पण वाचाआण्णा तुम्ही जा... मायला, बारक्‍याला सांभाळा

 

तालुक्यातील १२ गावे अध्याप कोरोना मुक्तच

पन्हाळा तालुक्यात एकूण १३० गावे असून त्यापैकी ११८ गावात कोरोना बाधित रुग्ण आहेत तर १२ गावे अध्याप कोरोनामुक्त आहेत.

हे पण वाचामराठा समाजाला आरक्षण देणारच! या मंत्र्याने दिली ग्वाही

 

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhala taluka is becoming a hotspot of corona