दहावी, बारावीची पेपर तपासणी घरातून, सीबीएसई बोर्डाचा निर्णय...

paper examination from home decision of CBSE board
paper examination from home decision of CBSE board

बेळगाव - लॉकडाऊनमुळे पेपर तपासणी करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने ( सीबीएसई ) दहावी व बारावीची पेपर तपासणी घरातुन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील, सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी व बारावीच्या विविध विषयांच्या पेपरची तपासणी घरातुन केली जाणार असुन 50 दिवसात पेपर तपासणीचे काम पुर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

देशभरातील ज्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पुर्ण झाल्या आहेत. त्या ठिकाणी निकाल लागण्यास विलंब होऊ नये यासाठी घरातुन पेपर तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली असुन 3 हजार शाळांमधील पेपर तपासणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या 18 लाख तर 12 वीच्या 12 लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी परीक्षा दिली आहे या सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा लाभ होणार आहे.

दहावी व बारावीच्या 173 विषयांच्या दिड कोटी हुन अधिक पेपरची तपासणी केली जाणार आहे. यासाठी मुल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना 50 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. यावेळी पेपर तपासणीसाठी अडचण निर्माण झाल्याने परीक्षांचा निकाल लागण्यास विलंब होणार असुन घरातुन पेपर तपासणीचे काम पुर्ण केले तरी निकाल लागण्यास दोन महिन्यात कालावधी लागणार आहे. अशी माहिती देण्यात आली असुन शिक्षकांच्या घरी पेपर पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच पेपर तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईनव्दारे अपलोड केले जाणार आहेत.लॉकडाऊनमुळे 10 व बारावीचे काही पेपर शिल्लक आहेत. यासाठी 1 ते 15 जुलैपर्यंत परीक्षा घेण्यात येईल असेही सीबीएसई बोर्डातर्फे कळविण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक सत्रावर मोठा परीणाम झाला असुन परीक्षा आणि निकाल वेळेवर लागावा यासाठी शिक्षण खाते व परीक्षा महामंडळांना विविध उपाय योजना कराव्या लागत आहेत. तरीही लॉकडाऊनमुळे परीक्षा वेळेवर पुर्ण होण्यास मोठी अडचण निर्माण होण्याची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com