आता पार्सल सेवा रात्री नऊपर्यंतच ; मात्र या हॉटेलांना परवानगी नाहीच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस, खाद्यगृहातील पार्सल व्यवस्था निश्‍चित केली आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्‌स, खाद्यगृहातून सुरू असणारी पार्सल सेवा रात्री ९ पर्यतच सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  दिले. या नियमातून बस स्थानक, रेल्वे रुग्णालये व महामार्गावरील हॉटेल वगळले आहेत. 
 

ते म्हणाले, राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हातील हॉटेल्स, लॉजेस (निवासी व्यवस्थेचे) १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यात निवास व्यवस्था नसलेल्या हॉटेल्स व रेस्टॉरंटसचा समावेश नाही. फुडकोर्टस व रेस्टॉरेंट्‌स यांना फक्त पार्सल सुविधा देता येईल असे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस, खाद्यगृहातील पार्सल व्यवस्था निश्‍चित केली आहे. 

हेही वाचा- सहा जणांनी रचला कट :  वर्चस्व वादातूनच तो हल्ला , तरूण गंभीर जखमी

हॅंडग्लोव्हज न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. मात्र, काही लोक रस्त्यावर थुंकणे, मास्क वापरत नाही, हॅंण्डग्लोज न वापरणे अशांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहे. 
दंड करण्याचा अधिकार पोलिस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दिला आहे.

हेही वाचा-ती आली जनू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना

 

देसाई यांनी दिलेल्या आदेशा म्हटले आहे की, जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावरील व फिरते फळ व भाजी विक्रेते, दुकानदार व व्यावसायिक आस्थापना यांच्याकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हॅंडग्लोज न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. यामुळे, जिल्ह्यात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मदत होईल.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parcel service from hotels restaurants and eateries should continue till 9 pm Order District Collector Daulat Desai