पालकांना भुर्दंड ः नविन शैक्षणिक वर्षात सहा महिन्यांसाठी द्यावी लागणार वर्ष भराची फी

 Parents will have to pay a full year fee for six months in the new academic year
Parents will have to pay a full year fee for six months in the new academic year
Updated on


कोल्हापूर ः कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले. शाळा 15 ऑगस्टनंतर सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सूचना केली आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्ष केवळ सहा महिनेच होणार असल्याची शक्‍यता दिसते. खासगी शाळांनी पालकांकडून फी मात्र वर्षभराची घेणे सुरू केले आहे. त्यामुळे शाळा होणार सहा महिने आणि फी मात्र बारा महिन्यांची का? असा प्रश्‍न खासगी शाळेतील पालकांना पडला आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा मार्च महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्या. शालेयस्तरावरील परीक्षाही रद्द केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून आटोक्‍यात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा 15 ऑगस्टनंतर सुरू कराव्यात, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्य शासनानेही शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, मात्र विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे, अशी भूमिका घेतली आहे. खासगी शाळेच्या शैक्षणिक वर्षावरही याचा परिणाम झाला असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षात शाळा ऑगस्टमध्येच सुरू होतील. एप्रिल 2021 मध्ये विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा होईल. 
दिवाळी सुटी, ख्रिसमस सुटी लक्षात घेतली तर यंदा सहा महिनेच शाळा होईल, अशी चिन्हे आहेत. अशा काळात शाळा पालकांकडून फी मात्र वर्षाची घेत आहेत. बहुतांशी शाळांनी फी भरण्याची सूचना पालकांना केली आहे, तर काही शाळांनी शाळा सुरू झाल्यानंतर फी भरा, असे सांगितले आहे. जेवढे दिवस शाळा होईल, तेवढीच फी घ्यायची की संपूर्ण वर्षाची फी भरायची, याबाबत अद्याप पालकांत संभ्रम आहे. काही शाळांनी फी परत देण्याचे आश्‍वासन पालकांना दिले आहे, मात्र बहुतांशी शाळांनी आपली भूमिका स्पष्ट केलीली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी संभ्रमात आहेत. 

जवळच्या विद्यार्थ्यांनाही स्कूलबसची सक्ती 
उच्च न्यायालयाने रिक्षा किंवा अन्य वाहनातून होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीला आक्षेप घेतला. याचा दाखला देत, काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना स्कूल बसची सक्ती केली आहे; मात्र शाळेजवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बसची आवश्‍यकता नाही. तरीदेखील त्यांना बसची सक्ती केल्याने पालकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड बसणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी शाळांनी फी वाढवू नये. तसेच पालकांकडून डोनेशन घेऊ नये, असा शासन निर्णय आहे. तो शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला असून, त्यांच्या मार्फत शाळांकडे पाठवला आहे. याचे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. 
- एस. डी. सोनवणे, शिक्षण उपसंचालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com