खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेला तरुण थेट तुरुंगातून लढवतोय ग्रामपंचायत निवडणूक; सर्वांचे लक्ष निकालाकडे

parshram pakhare Fighting elections from Belgaum Hindalga Jail
parshram pakhare Fighting elections from Belgaum Hindalga Jail
Updated on

बेळगाव :  खुनाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील आरोपी बेळगाव हिंडलगा कारागृहातून निवडणूक लढवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बेळगाव तालुक्‍यातील मुचंडी येथील रहिवासी व श्रीराम सेना हिंदूस्तान संघटनेचा कार्यकर्ता परशराम भरमा पाखरे (वय 37) मुचंडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवीत आहे. दरम्यान, पाखरेचे निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा आहे. 


मुचंडी येथील महेश नामक तरुणाच्या खून प्रकरणांत पाखरे याच्यावर गुन्हा दाखल झाला. सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून तो कारागृहात आहे. यात इतर आरोपींना अटक करताना पाखरेलाही अटक करण्यात आली. या प्रकरणांत पाखरे चौथ्या क्रमांकाचा आरोपी आहे. पाखरे याला निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती. परंतु, गल्लीतील रहिवाशी आणि मित्रांनी निवडणूक लढवण्यासाठी त्याच्याकडे आग्रह धरला. त्यानंतर त्यांनीचा रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय जाहीर प्रचारही गल्लीमधील लोकांनी केला.

देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गरजूंना मदत, रक्तदान व विविध सामाजिक उपक्रम राबविले. हाच धागा धरून समर्थकांनी मतदार संघात प्रचार करून मतदारांना आकृष्ट केले. यामुळे पाखरेला प्रचार आणि मतदान कालावधीत प्रतिसाद लाभला. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करून पाखरे विजयी होतील, असा विश्‍वास मित्रांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रभागात पाखरेसह चौघे उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाखरे याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vishwajeet Yadav Inspiring Journey to Mumbai Police Force
Kolhapur Gokul election political updates
Warna River crocodile alert news
Marathi News Esakal
www.esakal.com