धक्कादायक ; दोन रूग्णालयांच्या निष्काळजीपणात रूग्णाचा गेला प्राण

patient died between to hospital agreement
patient died between to hospital agreement

इचलकरंजी : कोरोनाच्या उपचारात व्यस्त असणाऱ्या आयजीएम रूग्णालयात सामान्य रूग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासमोर घडला. 50 वर्षीय पुरूषाला चक्कर आली म्हणून घरातील नातेवाईकांनी त्यांना आयजीएम रूग्णालयात आणले. आयजीएमच्या बाह्य रूग्ण कक्षातून खासगी डॉक्‍टरांकडे पाठवण्याचा सल्ला दिला. मात्र या रूग्णाला खासगी डॉक्‍टरांनी नाकारत पुन्हा आयजीएममध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. अशा हेलपाटांच्या चकरा मारत अखेर या रूग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागले.

आयजीएम कोविड रूग्णालय झाल्यापासून नॉन कोविड रूग्णांच्या उपचाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे. आजारी पडल्यानंतर गरजू लोक आयजीएमची पायरी चढतात. मात्र कोरोनाच्या काळात अशा सर्वसामान्य रूग्णांना आयजीएमच्या पायऱ्या मोडल्यासारखे झाले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका 50 वर्षीय पुरूषाला चक्कर आली म्हणून आयजीएमध्ये दाखल करण्यात आले. या रूग्णाला आयजीएममधून खासगी डॉक्‍टरांकडे जाण्यास सांगितले. खासगी डॉक्‍टरांनी पुन्हा आयजीएमचा सल्ला दिला. या धावपळीत रूग्णासह नातेवाईकांची मोठी फरपट झाली.

शेवटी या रूग्णाला आयजीएमध्ये आणल्यानंतर रिक्षातून बाहेर काढले आणि व्हीलचेअरवरून बाह्य रूग्ण कक्षात नेले. डॉक्‍टरांनी अखेर हा रूग्ण मृत झाल्याचे सांगितले. इचलकरंजी नगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्याने पाहिला. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गाडीने आयजीएममध्ये प्रवेश केला. रूग्णालयाबाहेर या मृताच्या गाडीला आरोग्य राज्यमंत्र्यांनी बाहेर जाण्यास रस्ता दिला. आयजीएममधील रूग्णांची हेळसांड होणाऱ्या या प्रकाराबाबत नगरसेवकांनी आरोग्यमंत्र्यांकडे हळहळ व्यक्त केली. या गंभीर प्रकाराबद्दल आरोग्य राज्यमंत्र्यांनी आयजीएम प्रशासनाला सुचना दिल्या.

  
कोरोनाच्या उपचाराचा ताण कर्मचाऱ्यांवर आहे. नॉन कोविड रूग्णांना योग्य पध्दतीने उपचार देण्याचा प्रयत्न यापुढे केला जाईल. रूग्णांची गैरसोय होण्याचे प्रकार थांबवले जातील.
-डॉ. आर. आर. शेटे, वैद्यकीय अधिक्षक, आयजीएम

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com