Video : काय आहे कोल्हापुरातील आजच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

Various trade associations including Mayor Nilofar Ajrekar  called for a curfew to curb the spread of corona
Various trade associations including Mayor Nilofar Ajrekar called for a curfew to curb the spread of corona

कोल्हापूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह विविध व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.या आवाहनाला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. विरोध आणि समर्थन असे दोन गट पडल्यामुळे हा समिश्र प्रतिसाद आहेत.

कांही ठिकाणे व्यापार,उद्योग सुरु आहेत. तर कांही ठिकाणी व्यापार,दुकाने बंद असल्याचे निदर्शनास आले.अनेकदा लॉकडाउन केल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे,फेरीवाल्यांचे आणि ज्यांची हातावर पोटे आहेत,अशा नागरिकांचे हाल होत आहेत. मार्च महिन्यापासून हा त्रास नागरिकांनी काढला आहे.त्यामुळे आता बंद केला जाणार नाही,अशी भुमिका कांही व्यापारी संघटनांनी घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर आजपासून जनता कर्फ्यु सुरु होताच,याला समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. राजारामपूरी,शाहूपूरी,लक्ष्मीपूरी,भाउसिंगजी रोडसह विविध ठिकाणी या जनता कफ्युला समिश्र प्रतिसाद मिळाला. 


कोल्हापूर शहरात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारापेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीत दररोज शहरात तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. सरकारी दवाखान्यांवरही ताण पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसाचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे.


संपादन - अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com