आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार यांना...

pdo will now issue birth and death certificates karnataka
pdo will now issue birth and death certificates karnataka
Updated on

बेळगाव - जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींच्या पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांना देण्यात आला आहे. शनिवारी याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून बजाविले आहेत.

राष्ट्रीय जन्म आणि मृत्यू कायदा 1969 अन्वये पीडीओंना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यापूर्वी प्रमाणपत्रासाठी तलाठ्याकडे अर्ज करावे लागत होते. पण, आता पीडीओ निर्णय घेतील. बापूजी केंद्रातून विविध सेवा दिल्या जात आहेत. यात आता जन्म व मृत्यू दाखल्याची भर घालण्यात आली आहे.

दाखल्यांच्या वितरणासाठी शासनाकडून दर निश्‍चित केले आहेत. त्यानुसार शुल्क आकारणी करून प्रमाणपत्र देण्याबाबत कळविले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. पण, हिरवा कंदील मिळाला नव्हता. गेल्या आठवड्यात सविस्तर चर्चा झाली आणि शनिवारी प्रमाणपत्र वितरणाचे अधिकारी पीडीओंना देण्यात आले आहेत. तसेच पंचायत विकास अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करतानाच जन्म व मृत्यू दाखला वितरण अधिकारी म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे आधीन सचिव सी मंजूर यांनी आदेश बजाविला आहेत.

दरम्यान, यासंदर्भात निर्णय घेऊन आदेशाची प्रत शनिवारी सर्व जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतींना पाठविण्यात आला आहे. आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील दाखल्यांची पडताळणी करून त्वरीत प्रमाणपत्र वितरणास सुरवात करावी, असे स्पष्ट केले आहे.

तलाठ्यांच्या अधिकारात कपात

ग्रामपंचायत कार्यकक्षेत तलाठ्यांना जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचा अधिकार होता. सुधारीत आदेशात पीडीओकडे त्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे तलाठ्यांचे अधिकारी
काढून घेण्यात आले आहेत. शासनाच्या पातळीवर अलिकडे विविध महसूल विभागाची कामे ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आली आहेत. त्यामध्ये आता याची भर पडली आहे.

संपादन - मतीन शेख
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union election voter list 2026
Kolhapur Wrestler Death pattankodoli
Why is Kolhapur water pumping banned?
Falling River Levels Trigger Water Scarcity Fears Across Kolhapur District
Marathi News Esakal
www.esakal.com