"पीऽऽऽ ढबाक यंदा घुमणार नाहीच 

 "Peet Dhabak will not be touring this year in kolhapur
"Peet Dhabak will not be touring this year in kolhapur
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ महिना सांगतेकडे निघाला असताना आता आषाढाची चाहूल लागली आहे; मात्र आषाढात होणाऱ्या त्र्यंबोली यात्रेच्या सांस्कृतिक सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट राहणार आहे. त्यामुळे "पीऽऽऽ ढबाक'चा गजर शहरातील बहुतांश भागात यंदा घुमणार नाही, असेच स्पष्ट चित्र आहे.

कोरोनाच्या महामारीच्या काळात गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला असून, त्र्यंबोली यात्रेचा सोहळाही काही मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत कुठल्याही मिरवणुकीशिवाय होण्याची शक्‍यता अधिक आहे. किंबहुना खबरदारी म्हणून हाच पर्याय योग्य राहणार असल्याची चर्चा आता पेठांपेठांत सुरू झाली आहे. 


कोल्हापुरात जन्माला येणाऱ्या माणसाने वर्षातून किमान एकदा त्र्यंबोलीदेवीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वीपासूनच त्र्यंबोली यात्रा आणि ललित पंचमीच्या सोहळ्याचे प्रयोजन आहे. नदीचे नवे पाणी त्र्यंबोली देवीला अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. नारळीच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाडीत नदीच्या पाण्याच्या कळशा घेऊन, महिलांनी डोईवर कळशा घेऊन किंवा पुरुषांनी कावडीतून हे पाणी मिरवणुकीने देवीला वाहिले जाते. त्यासाठी "पीऽऽ ढबाक' या पारंपरिक वाद्यांवरच भर दिला जातो. यंदा मात्र या सोहळ्यावर मर्यादा येणार असून, तालमींत मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. त्याशिवाय तालमीचे काही मोजकेच कार्यकर्ते त्र्यंबोली टेकडीवर जाऊन देवीला पाणी वाहणार आहेत. मात्र, गल्लीची जत्रा हा माहौल कायम राखताना घरोघरी मांसाहाराचा बेत मात्र कायम राहणार आहे. 

मटणाचे वाटे अन्‌ आंबील, घुगऱ्या..
आखाडी जत्रा, पाहुण्यांची लगबग, पीऽऽ ढबाक, मटणाचे वाटे, सजवलेल्या बैलगाड्या, टेंबलाई-मरगाईच्या नावानं चांगभलंचा गजर, गुलालाची उधळण, नदीच्या नवीन पाण्याचा खुळा रस्सा... अशा अस्सल कोल्हापुरी शब्दांची सुरेख गुंफण करीत या सोहळ्याची चाहूल शहराला विविध माध्यमातून लागते. मात्र, यंदा गणेशोत्सवाबरोबरच त्र्यंबोली यात्रेचा सोहळाही अगदी साध्या पद्धतीनेच साजरा होणार आहे. 

चार मंगळवार अन्‌ चार शुक्रवार 
यंदा 22 जूनपासून आषाढाला प्रारंभ होणार आहे. या महिन्यात चार मंगळवार आणि चार शुक्रवार आहेत. मात्र, आषाढी एकादशीनंतरच त्र्यंबोली यात्रांना प्रारंभ होतो. त्यानंतरचा विचार केला तरी दोन मंगळवार आणि तीन शुक्रवार यात्रेसाठी मिळतील. 30 जूनपर्यंत त्र्यंबोली देवीचे मंदिरही दर्शनासाठी खुले नसेल. शासनाच्या पुढील आदेशानंतरच मंदिर दर्शनासाठी खुले होण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com