esakal | कपडे धुऊन नदीवर प्रदूषण कराल तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Penalties for washing on the river kolhapur marathi news

कारवाई सुरू केल्यानंतर काही लोक पळून गेले. या वेळी तेथील अंथरुण व कपडे जप्त केले.

कपडे धुऊन नदीवर प्रदूषण कराल तर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे (कोल्हापूर) :  पाडव्यासाठी पंचगंगा नदीच्या शिंगणापूर घाटावर कपडे व वाहनांची स्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर अखेर शिंगणापूर ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांच्या मदतीने कारवाई करून सात हजारांवर दंड वसूल केला. या कारवाईमुळे पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास मदत झाली.

कपडे, वाहने स्वच्छ करण्याने तसेच सांडपाण्याने पंचगंगेचे प्रदूषण होत आहे. शिंगणापूर, हणमंतवाडी, चिखली, आंबेवाडी, तसेच कोल्हापूर शहराला पुरवठा केला जातो. मात्र, वारंवार सूचना देऊनही नागरिक कपडे धुण्यासाठी येत असल्याने ग्रामपंचायतीने करवीर पोलिसांना पाचारण करून कपडे धुणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत सुमारे साडे सात हजारांचा दंड वसूल केला. 

कारवाई सुरू केल्यानंतर काही लोक पळून गेले. या वेळी तेथील अंथरुण व कपडे जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक संदीप कोळेकर, सुभाष कांबळे, सरपंच प्रकाश रोटे, सदस्य महेश पाटील, कर्मचारी गणेश चव्हाण, प्रदीप भोसले, संतोष पाटील, अभिजित पोर्लेकर, कृष्णात चौगले, फिरोज मुल्लाणी, आनंदा पाटील तसेच महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

हेही वाचा- महिलांचा आक्रोश: नंग्या तलवारींचा धाक; महिलांसह सहा जण जखमी

शिंगणापूर घाटावर कपडे, वाहने, जनावरे धुतल्याने नदीचे प्रदूषण वाढते. नागरिकांना तेच पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायतीने ही कारवाई केली. यापुढे धुणे धुऊ दिले जाणार नाही.
- प्रकाश रोटे, लोकनियुक्त सरपंच

संपादन-अर्चना बनगे