People of ichalkaranji Without waiting take a decision
People of ichalkaranji Without waiting take a decision

निर्णयाची वाट न बघता, स्वयंस्फुर्तीने पाळला "लॉकडाऊन' 

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढताना अनेक घटकांनी लॉकडाउनची प्रतिक्षा केलीच नाही. शहराला वाचवण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपापला व्यवसाय बंद करून प्रशासन व राजकीय लोकांच्या निर्णयापुढे नागरिकांनीच एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील या घटकांनी घेतलेला हा निर्णय नागरिकांच्यातही कौतुकास्पद ठरला. 

शहरात गेले 15 दिवस कोरोनाच्या रूग्णात प्रचंड वाढ झाली आहे. दररोज सरासरी 3 ते 11 रूग्ण शहरात सापडले आहेत. अनेक ठिकाणी संसर्ग झाल्याने संपूर्ण भागात कोरोनाचे रूग्ण दिसू लागले. वास्तविक प्रशासनाने कडक भूमिका न घेतल्याने अनेक नागरिक बिनधास्तपणे आणि कोणतीही सुरक्षितता न बाळगता फिरू लागले. याचा परिणाम रूग्ण वाढण्यावर झाला. वास्तविक प्रशासन इचलकरंजी संपूर्ण लॉकडाउन करेल अशी नागरिकांची मानसिकता होती. बहुतांश घटक इचलकरंजी वाचवण्यासाठी लॉकडाउन होणे गरजेचे आहे याचीच मागणी करत होते. मात्र शहराचा हा निर्णय विविध पातळ्यांच्या चर्चेवरच फिरत राहिला. त्यामुळे नागरिकांच्यात एकूणच या निर्णयावरून नाराजीचा सूर कायम होता. 

संसर्ग अधिकच वाढत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या. प्रशासनाने निर्णय जाहीर करण्यापूर्वीच शहरातील नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, इलेक्‍ट्रॉनिक विक्री करणाऱ्या दुकानदारांची संघटना यासह अनेकांनी शहरातील व्यवहार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही अनेकांनी कालपासूनच सुरू केली आहे. 
शहर वाचविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता विविध घटकांनी टाकलेले हे पाऊल निश्‍चितच कौतुकास्पद ठरले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी अशा अनेक घटकांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच काही प्रश्‍नावर नागरिकच मार्ग काढतील अशी आशा निर्माण झाली आहे. 

दृष्टिक्षेप   
- इचलकरंजीत 15 दिवसांपासून वाढताहेत रूग्ण 
- दररोज आढळताहेत सरासरी 3 ते 11 रूग्ण 
- विविध संघटनांनी पुढाकार घेत व्यवसाय केले बंद 
- प्रशासनाने कठोर भूमिका न घेतल्याने नागरिक फिरत होते बिनधास्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com