इचलकरंजीकरांची काळजी प्रशासनाला; नागरिकांचे दुर्लक्षच

people ignore pracation of corona in ichalkaranji dangerous to health
people ignore pracation of corona in ichalkaranji dangerous to health
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग वाढत आहे. सध्या शहरात स्फोटक परिस्थीती नसली तरी नजिकच्या काळात संसर्गाचा मोठा उद्रेक होण्याची भिती व्यक्त होत आहे. कारण शहरात किमान 50 टक्के नागरिक मास्क वापरत नसल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला आहे. शिवाय कोरोना लसीकरणालाही अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत प्रशासन पातळीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या लाटेमध्ये जिल्ह्यात सर्वप्रथम इचलकरंजीत कोरोनाचा उद्रेक झाला होता. मृत्यूदरही महाराष्ट्रात सर्वाधिक इचलकरंजीत होता. त्यामुळे प्रशासन हबकले होते. आता पून्हा दुसर्‍या लाटेचे संकट शहरावर आले आहे. पून्हा शहरातील प्रत्येक भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. केवळ शहरच नव्हे तर नजिकच्या ग्रामीण भागातही संसर्ग वाढत चालला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. किंबहूना कोरोनाची भितीच नागरिकांत राहिली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील सुमारे 50 टक्के नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे मत प्रशासनाचे बनले आहे.

दुसर्‍या लाटेतील स्थिती

शहरात दुसर्‍या लाटेत 38 दिवसांत 127 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सुरुवातील दोन -तीन आढळणारी रुग्णसंख्या आता सरासरी सात ते आठ इतकी आढळत आहे. हळूहळू ही संख्या नजिकच्या काळात वाढण्याची भिती अधिक आहे.

उच्चभ्रु वस्तीत प्रभाव

शहरात सद्या उच्चभ्रु वस्तीमध्येच कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळत आहे. बहुतांशी रुग्णांचा इतिहास हा कोरोनाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातून प्रवास झाल्याचा आहे. तथापि, सुदैवाने झोपडपट्टी परिसरात मात्र अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

सक्रीय रुग्ण संख्या अशी

  • सक्रीय रुग्णांची संख्या - 72
  • गृह अलगीकरणातील रुग्ण - 39
  • रुग्णालयात दाखल रुग्ण - 33
  • आयजीएम रुग्णालयातील रुग्ण -17

100 बेडचे कोविड सेंटर

शहरात पून्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शहरात पून्हा 100 बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज ठेवले जाणार आहे. मात्र त्यासाठी जागा अद्याप निश्‍चीत झालेली नाही. गेल्या वेळी जिल्हा परिषदेची मोठी मदत झाली होती. आता मात्र सर्व भार पालिकेवर असणार आहे.

केवळ 20 टक्के लसीकरण

शहरात 45 ते 60 वयोगातील लसीकरणाचे सुमारे 37 हजार लाभार्थी आहेत. तथापी, केवळ 20 टक्के म्हणजे केवळ साडेसात हजार नागरिकांनी लस घेतली आहे. तर एकूण लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 25 हजार इतकी आहे. शहरात सद्या 9 ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दोन खासगी तर एक शासकीय रुग्णालय व सहा नागरि आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahu Chhatrapati on Manoj Jarange maratha reservation
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vishwajeet Yadav Inspiring Journey to Mumbai Police Force
Kolhapur Gokul election political updates
Marathi News Esakal
www.esakal.com