दिलासादायक... कोरोना काळातही प्लेसमेंटच्या संधी 

Placement opportunities even during the comforting Corona period
Placement opportunities even during the comforting Corona period
Updated on

कोल्हापूर : वर्षभरापासून असणारी आर्थिक मंदी, त्याचच आलेले कोरोनाचे संकट यामुळे उद्योग क्षेत्राची स्थिती बिकट झाली. जिल्ह्यातील काही प्रमूख अभियांत्रिकी महाविद्यालयांत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्यातून सुमारे 800 ते 1 हजार विद्यार्थ्यांची निवड झाली.

या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांची शेवटच्या वर्षाबद्दल जरी निर्णय झाला नसला तरी या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे. 

कोरोना संकटाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर उद्योग विश्‍वावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. बहुतांशी उद्योग संस्थांनी होणारे नुकसान कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याचे धोरण स्विकारले. त्यामुळे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला.

या साऱ्या नकारात्मक पार्श्‍वभूमीवर दिलासा देणारी एक बाब समोर आली. जिल्ह्यातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत फेब्रुवारी, मार्चमध्ये जे कॅम्पस इंटरव्हयू झाले होते. कोव्हीड मंदीच्या पार्श्‍वभूमीवर या विद्यार्थ्यांना रुजू होण्याचे पत्र मिळणार नाही, त्यातच शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द झाली तर महाविद्यालयांनी निवडलेली गुणपद्धती या कंपन्यांना चालणार का?. अशी शंका होती. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांना रुजू होणारे पत्र मिळाले आहे.  याबाबत के.आय.टी महाविद्यालयाचे प्रा. सुभाष माने म्हणाले, "15 मार्च पूर्वी ज्या कंपन्या आल्या, त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. मुलाखती घेतल्या. त्यांना आवश्‍यक असणारी कौशल्ये विद्यार्थ्यांत आहे का? हे त्यांनी पडताळले. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यातील बहुतांशी विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शेवटच्या वर्षाची परीक्षा जर रद्द झाली तरी गेल्या सत्रातील गूण आणि अंतर्गत परीक्षांचे गूण या आधारावर त्यांचे मुल्यमापन होईल. याचा परिणाम त्यांच्या नोकरीवर होणार नाही.' कंपन्यांनी निवड केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात येईल. असे या कंपन्यांनी सांगितले आहे. 

आर्थिक स्थिती चिंताजनक असताना मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट झाल्या आहेत. याचा अर्थ कोणत्याही संस्थेत चांगल्या मनुष्यबळाची गरज असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. ज्या विद्याशाखेचे आपण विद्यार्थी आहेत, त्या शाखेचे अद्ययावत आणि सखोल ज्ञान घेतले पाहीजे. 
- डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी, संचालक, केआयटी, महाविद्यालय. 

या कंपन्यांनी केली प्लेसमेंट 
*कॅपजेमिनी * टेक महिंद्रा * टी.सी.एस * कॉग्निझंट * इंटेल * टेक्‍नीमॉंट * ब्लॅक अण्ड व्हिच, इंटेल. 

महाविद्यालयनिहाय निवड झालेले विद्यार्थी असे : 
* केआयटी महाविद्यालय - 250 
* डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय - 275 
* तात्यासाहेब कोरे इंजिनिअरींग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी - 175 
* संजय घोडावत विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Marathi News Esakal
www.esakal.com