
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकाला कसबा बावडा येथील एका नगरसेवकाने आणि विद्यमान पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली होती. एका बाजूला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाशी लढत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरवासीयांची सेवा करत असताना पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ आणि मारहाण होणे हा प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे. अशा प्रकारांच्या घटना घडू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
कोरोनाचा कहर कोल्हापुरात वाढत असताना पालिकेची यंत्रणा गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र कष्ट करत आहे. सर्वच विभाग यामध्ये कार्यरत आहेत विशेषताः आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर व्यवस्थेचा ताण आहे. शहरातील दैनंदिन साफसफाईबरोबरच कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणी करणे, विविध भागातील सर्वेक्षण करणे, झोपडपट्टीमध्ये जागृती निर्माण करणे, शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे सर्व पाहणे, ज्या परिसरात रुग्ण आढळले तेथे प्रभाग सील करणे या जबाबदाऱ्या विभागाला पार पाडाव्या लागत आहे. अडीच महिने अधिक काळ अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही.
अशा स्थितीत या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे दमदाटी करणे आणि मारहाण करणे हे कृत्य लोकप्रतिनिधींना न शोभणारे आहे. एका बाजूला कोरोना योद्धा म्हणून इतर प्रभागात आरोग्य कर्मचारी सेवक अधिकारी यांच्यावर फुलांचा वर्षाव होत असताना कसबा बावडा येथे अधिकाऱ्याला मारहाण होतेच कशी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दृष्टिक्षेप
- मारहाणीचे प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
- अडीच महिने कर्मचाऱ्यांनी सुट्टीही घेतलेली नाही
- एकीकडे फुलांचा वर्षाव, दुसरीकडे मारहाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.