कोल्हापूर : पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Police constable dies of heart attack in kolhapur gargoti
Police constable dies of heart attack in kolhapur gargoti

गारगोटी : येथील भुदरगड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महादेव लक्ष्मण आबिटकर (वय ५५) यांचा आज सकाळी कर्तव्य बजावित असताना ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. 

त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

श्री. आबिटकर सैन्य दलातील सेवानिवृत्तीनंतर पोलिस दलात सेवा बजावत होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते पोलीस ठाण्यात कामावर आले होते. त्यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.  सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलिसांसह गारगोटी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.  

 दुपारी शहरात फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हुतात्मा चौकात पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी त्यांच्या  पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. सरपंच संदेश भोपळे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com